'मोदींचा रथ तुमच्या गावात आला तर....' उद्धव ठाकरेंचे मतदारांना आवाहन

Uddhav Thackeray On Modi Rath: मोदींचा रथ तुमच्या गावात आला तर आता आडवा,आता मोदी आणि आपण समान आहोत, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले आहे.

Pravin Dabholkar | Updated: Mar 18, 2024, 03:29 PM IST
'मोदींचा रथ तुमच्या गावात आला तर....' उद्धव ठाकरेंचे मतदारांना आवाहन title=
Uddhav Thackeray On Modi Rath

Uddhav Thackeray On Modi Rath: मोदींचा रथ तुमच्या गावात आला तर आता आडवा,आता मोदी आणि आपण समान आहोत, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले आहे. ते हिंगोलीच्या सभेत बोलत होते. तहान भूक हरपून सगळेजण भाजपला तडीपार करण्यासाठी कामाला लागलेत.मी लोकांच्या सभा ऐकून महाराष्ट्र भर फिरतोय,महाराष्ट्र मला कुटुंबातील सदस्य मानतात,जे पण करतोय त्यांना सांगतोय. कालच्या सभेत माझ्यावर टीका झाली. काही मोदी भक्त म्हणतायेत उद्धव ठाकरेंची भाषा बदलली. भाजपच्या खूळखुळ्यांनो आम्ही देशप्रेमी आहोत आणि तुम्ही मोदी भक्त आहात, असे ते म्हणाले. 

परभणीचे खासदार संजय जाधव यांनी आपलं मूळ सोडलं नाही. ते अडचणीत शिवसेनेबरोबर उभे राहिलेत. पहिल्या वेळी हिंगोली आणि परभणी ह्या दोन लोकसभा मधून दोन खासदार निवडून दिले होते. पण येथे विद्यमान खासदार सोडून देण्याची परंपरा होती, वसमतचा 100 कोटींचा हळद संशोधन प्रकल्प मी दिला. यांना आमदार खासदार केलं. मंत्री केलं पण यांची भूक मागत नाही. यांनी लाज लज्जा सोडली. गद्दारी करणाराऱ्यांना लाज नाही, असेही ते म्हणाले. 

धनुष्यबाण चोरांच्या हाती आहे. आता सर्वोच्च न्यायालयाकडून आपल्या न्यायाची अपेक्षा आहे. सर्वोच्च न्यायालयाने शरद पवारांचा फोटो लावल्यावरून अजित पवारांवर फटकारले होते. यावरुन उद्धव ठाकरेंनीदेखील बेशरम अवलाद म्हणत अजित पवारांवर टीका केली. तुम्ही घरफोडे, तुमच्याकडे स्वतःचे नेते आहेत का? फडणवीसांवर टीका केली. माझ्या वडिलांचे फोटो लावण्यापेक्षा ईडी सीबीआयचे फोटो लावा, असे त्यांनी शिंदे गटाला उद्देशून म्हटले. 

खंडण्या गोळा करायला लावणारा भारतीय जनता पक्ष झालाय.आता अच्छे दिन नाही तर सच्चे दिन येणार. हिंदुत्ववादी आहेत काहीतरी देशासाठी करतील, असे मला वाटले होते. पण पुलवामा हल्ल्यात सुरक्षा देण्यात आली नव्हती. देशाच्या रक्षणासाठी निघालेले जवान शहीद झाले होते. ही जबाबदारी मोदींची नाही का? सत्यपाल मलिक जे बोलले त्यावरुन चौकशी का लावत नाहीत? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला.

अबकी बार भाजपा तडीपार हा आपण नारा दिलाय, हा संदेश गावागावापर्यंत पोहचला पाहिजेत. गावा गावात जाऊन यांचा बुरखा फाडा. 2047 तर सोडाच 5047 पर्यंत भाजप पुन्हा सत्तेत येणार नाही, असे यावेळी ते म्हणाले.