घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, नवी मुंबईत 5 हजार घरांची सोडत

Navi Mumbai: 5000 house lottery by CIDCO in Ganpati Utsav : नवी मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज आहे. 5000 घरांची सोडत काढण्यात येणार आहे.

Updated: May 29, 2022, 07:40 AM IST
घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, नवी मुंबईत 5 हजार घरांची सोडत  title=

नवी मुंबई : Navi Mumbai: 5000 house lottery by CIDCO in Ganpati Utsav : नवी मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज आहे. गणेशोत्सवात (Ganpati Festival) सिडकोच्या (City and Industrial Development Corporation - CIDCO) पाच हजार घरांची योजना आहे. (CIDCO House) वाशी, जुईनगर, मानसरोवर इथे ही घरं उपलब्ध होणार आहेत. 

पंतप्रधान आवास योजनेत सर्वाधिक घरे सिडकोच्या माध्यमातून बांधली जात आहेत. यातल्या पहिल्या टप्प्यात 23 हजार 500 घरं बांधून झाली आहेत. त्याची वाटपप्रक्रिया पूर्ण झालीय. 

दुसऱ्या टप्प्यात 67 हजार घरं प्रस्तावित आहेत. या घरांचा आराखडा तयार करून कंत्राटदारही नेमले आहेत. सध्या निर्मितीच्या प्रक्रियेत असलेल्या 35 हजार घरांना महारेराची मंजुरी मिळाली आहे. गणेशोत्सवाच्या मुहुर्तावर पाच हजार घरांची सोडत काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.