नागपूर : भाजपमधील अंतर्गतवाद आता चव्हाट्यावर येत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपच्या नेत्यांवर जाहीर टीका केली. त्यानंतर प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खडसे यांनी जोरदार उत्तर दिले. पक्षाने एकाच घरात किती जणांना उमेदवारी द्यायची, असा सवालही उपस्थित केला. त्याचवेळी चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे यांनीही उमेदवारी देण्यात आलेली नाही, असे सांगितले. त्यांनीही दु:ख व्यक्त केल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. आज चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर स्पष्टीकरण दिलेय. मी विधानपरिषदेचे तिकीट मागितली नव्हते. त्यामुळे भाजपमध्ये आलबेल असल्याचे दिसून येत आहे.
काल 'झी २४तास 'वर चंद्रकांतदादांनी आपली भूमिका मांडताना बावनकुळे यांना तिकीट मिळाले नसल्याबाबत दुःख व्यक्त केले. मला वाटतं पक्षाची भूमिका जो कार्यकर्ता जिथे उपयुक्त आहे, त्यानुसार ठरली असावी. मला आता महाराष्ट्राच्या कोरोनाबाबत कामाकरिता अध्यक्ष नेमले आहे. मी पक्षाचे काम करतोय. विधानसभा निवडणुकीत मला पूर्व विदर्भातील ३२ जागांची जबाबदारी दिली होती. मी-विधानपरिषदेचे तिकीट मागितली नव्हते, असे म्हटले आहे.
मला असं वाटतं की त्यांच्या सध्याच्या भूमिकेवरुन असं चित्र दिसत आहे की आता जुन्या लोकांना तिकीट द्यायचे नाही. नवीन कार्यकर्त्याला द्यायचे. मी नाव पाठवलं नाही आणि तिकीट मागितलं नव्हते. पक्षाने माझ्या नावाचा विचार केला त्याबाबत धन्यवाद, असे सांगत चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपले मौन सोडले.
पक्षाची भूमिका ठरली असेल. पक्षाने आमच्याकरिता काय भूमिका घेतली आहे. त्यावेळी योग्य निर्णय घेऊ. पक्ष डावलत आहे, असे आजच्या दोन घटनांवरून म्हणता येत नाही. पुढच्या काळात योग्य जबाबदारी मिळेल, अशी आशा चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केली. त्याचवेळी खडसे नाराज दिसले. त्यांच्या भूमिकेबाबत मी बोलणे योग्य नाही, असे सांगत प्रतिक्रिया देण्याचे टाळले.