नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पेठ कळवण सुरगाणा भागात अतिसाराच्या साथीनं धुमाकूळ घातलाय. या साथीत आत्तापर्यंत चार जणांना आपले प्राण गमवावे लागलेत. धक्कादायक म्हणजे, बुधवारी एकाच दिवशी दोन जण दगावलेत... तर गेल्या आठवड्याभरात जवळपास २०० अतिसाराचे रुग्ण आढळलेत. नामदेव गांगुर्डे, सीताराम पीठे, बशिर्या लिलके, नवसू पवार अशी या साथीत दगावलेल्या रुग्णांची नावं आहेत.
नाशिक जिल्ह्यातल्य पेठ कळवण आणि सुरगाणा या तालुक्यांमध्ये अतिसाराच्या साथीनं चार जणांचा बळी गेलाय. हा आदिवासीबहुल भाग आहे. आठवड्याभरात दोनशेहून अधिक जणांना अतिसाराची लागण झालीय. बुधवारी एकाच दिवशी दोघांचा मृत्यू झालाय. एकविसाव्या शतकाची साडे अठरा वर्ष उलटल्यावर नाशिक जिल्ह्यातल्या आदिवासी नागरिकांना अतिसारासारख्या बऱ्या होण्याजोग्या रोगापायी चार बळी जाणं हे, महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य सेवांच्या स्थितीचं विदारक चित्र स्पष्ट करणारं आहे
अतिसार म्ह्णजे अन्न्नलिकेची पोट साफ करण्यासाठीची हालचाल वाढणं... अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणं तसंच मल पातळ होण्याचं प्रमाण वाढणं, पोटात ढवळणं, उलट्या, जुलाब ही दोन अतिसाराची लक्षणं असू शकतात. अस्वच्छ आहार आणि अशुद्ध पाण्यामुळं हा आजार उद्भवू शकतो.