Maharashtra Crime : नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये (Malegaon) एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये हरिण आणि मोर ( Deer and Peacock Haunting Viral Video ) यांची शिकार करण्यात आल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रीय पक्षाची शिकार होत असल्याने वनविभागाबाबत (Forest Department) अनेक सवाल उपस्थित करण्यात येत आहेत. शिकार करणाऱ्यांना चांगली अद्दल घडविण्यात यावी, अशी मागणी प्राणी आणि पक्षी प्रेमींकडून करण्यात येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृत हरणांवर बंदूक ठेवून फोटो सेशन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय पक्षी मोराला मारुन सुराने त्याचे मास काढतांना तसेच हरणांची शिकार करुन त्यावर शिकारीची बंदूक आणि पाय ठेवून फोटो काढण्याचा व्हिडिओ मालेगाव आणि सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेमके हे व्हिडिओ कधीचे आणि कुठले याबाबत कुठलीही पुष्टी देण्यात आलेली नाही. मात्र, शिकाऱ्यांनी चार हरणांची शिकार केल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. दरम्यान, शिकार केलेले आरोपी फरार झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस आणि वन विभागाकडून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
बोली भाषेवरुन हे शिकारी मालेगाव परिसरातील असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. वन विभागाच्या नाकावर टिचून सऱ्हासपणे राष्ट्रीय पक्षाची हरणांची क्रूर पद्धतीने शिकार होत असल्याने वन्यप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. वन विभाग या शिकाऱ्यांवर कारवाई करेल का, असा सवाल व्यक्त केला जात आहे.