औरंगाबादमधल्या करमाड गावात आठवडी बाजारात ट्रक घुसला, 12 गंभीर जखमी

औरंगाबादमध्ये करमाड गावातल्या आठवडी बाजारात नियंत्रण सुटल्याने ट्रक घुसला,  त्यात 12 जण गंभीर जखमी झालेत.  

Updated: Mar 19, 2018, 02:32 PM IST

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये करमाड गावातल्या आठवडी बाजारात नियंत्रण सुटल्याने ट्रक घुसला,  त्यात 12 जण गंभीर जखमी झालेत.  

नियंत्रण सुटलेला हा ट्रक रिक्षा आणि ट्रॅक्टरला धडकला. त्यात रस्त्यावर बसलेले कापूस व्यापारी जखमी झालेत. 

हा कंटेनर जालनाहून औरंगाबादच्या दिशेने येत होता. करमाड हे जालना आणि औरंगाबाद रस्त्यावर असलेलं गाव आहे. येथे आठवडी बाजार भरला होता. हा कंटेनर ट्रॅक्टरला धडकला. त्यानंतर आठवडी बाजारात हा कंटेनर घुसला. तेथे

तेथे कापूस विकण्यासाठी काही व्यापारी बसले होते. या अपघातात हे व्यापारी गंभीर जखमी झालेत.