Eknath Shinde - Devendra Fadnavis Govt.: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde ) यांनी पुत्र खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde ) यांच्या कल्याण मतदारसंघासाठी (Kalyan Constituency) कोट्यवधीच्या निधीची खैरात केली आहे. याआधी राणे यांच्या बालेकिल्ल्यात कोट्यवधी रुपयांचा निधी दिलाय. आता मुलाला झुकते माप दिल्याची चर्चा सुरु झाली आहे.एक-दोन नाही तर तब्बल 11 हजार कोटींची कामं श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात होणार आहेत. नुकत्याच झालेल्या एमएमआरडीएच्या बैठकीत यासाठी निधीची तरतूद करण्यात आलीय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी दिलाय. निधी देताना खैरात केली आ हे. ठाणे शहरातील विकासकामांना मुंबई महानगर विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) गती दिली जात असतानाच, मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत यांच्या कल्याण मतदारसंघासाठीही एमएमआरडीएने हात सैल केला आहे. कल्याण मतदारसंघातील प्रमुख रस्त्यांसाठी प्राधिकरणाने 11 हजार कोटी रुपयांच्या निधीचे नियोजन केले आहे.
श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात अनेक विकासकामे हाती घेतली आहेत. यात कल्याण-एनआरसी-टिटवाळा दरम्यान तीन ते चार पदरी रस्त्याचे कॅाक्रिटीकरण, टिटवाळा ते बदलापूरदरम्यानच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण, कल्याण ते माणकोली (बापगाव), शीळफाटा ते माणकोली, ऐरोली बोगदा ते काटई नाका वाहतूक प्रकल्प, टिटवाळा-पडघा रस्त्याचे रुंदीकरण, काँक्रीटीकरण आणि नवी मुंबईतील महापे ते दहीसरदरम्यान दोन स्वतंत्र बोगदे तसेच दहीसर गाव ते मुरबाडदरम्यान नवा रस्ता आणि खारेगाव ते पडघा या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे.
दरम्यान, राज्यात शिंदे फडवणीस सरकार ( Eknath Shinde - Devendra Fadnavis Govt.) आल्यानंतर सिंधुदुर्गातील कणकवली नगरपंचायतला दिवाळी बंपर निधी मिळाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून रस्ते विकासासाठी विशेष रस्ता अनुदान या योजनेअंतर्गत 5 कोटी तर नागरी सुविधासाठी नागरी सुविधा योजनेअंतर्गत 5 कोटी आणि अन्य विकास योजनांतून 13.30 कोटी मिळून एकूण 23.30 कोटींचा निधी मंजूर केलाय. राणेंच्या मतदार संघात जास्तीचा निधी दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. (chief minister eknath shinde donates kankavali nagrpanchyat parishad 23 crore and 30 lakhs fund)