KCR in Maharashtra : बीआरएसचे नेते आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (Telangana Chief Minister K Chandrashekhar Rao) यांनी महाराष्ट्रात सर्व निवडणुका लढवणार असल्याची मोठी घोषणा केली. यानंतर चंद्रशेखर राव यांनी BRS पक्षाचा महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार देखील निवडला आहे. महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याला चंद्रशेखर राव यांनी थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे. बीआरएसच्या महाराष्ट्र प्रवेशामुळे राज्यातल्या नेत्यांना भीती का असा सावल सरकोलीतील सभेतून केसीआर यांनी उपस्थित केला होता. बीआरएस शेतक-यांची बी टीम असल्याचेही ते म्हणाले होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना BRSनं मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे. मात्र, के. चंद्रशेखर राव यांची ही ऑफर आपण धुडकावून लावली, असा दावा राजू शेट्टी यांनीच केला आहे. BRS पक्षात प्रवेश करण्याची अट त्यांनी घातली होती. शेतकरी नेत्यांना फोडण्याचा प्रयत्न के. चंद्रशेखर राव करत आहेत, असा आरोपही राजी शेट्टी यांनी केला आहे.
KCR यांनी भाजपचे माजी नगरसेवक नागेश वल्याळ यांना BRS पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. यावर समाजातील ज्येष्ठ लोकांशी सल्लामसलत करून भविष्यात पुढील गोष्टींचा विचार करणार असल्याचं वल्याळ म्हणालेत. नागेश वल्याळ हे भाजपचे पश्चिम महाराष्ट्रातील पाहिले खासदार लिंगराज वल्याळ यांचे पुत्र आहेत.
माजी मंत्री आणि भाजपचे सोलापुरातले ज्येष्ठ नेते लक्ष्मण ढोबळे यांची मुलगी बीआरएसमध्ये जाणार का याची चर्चा सुरु झाली आहे. लक्ष्मण ढोबळे यांची कन्या आणि बहुजन रयत संघटनेच्या कोमल ढोबळेंनी तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट असल्याचं कोमल ढोबळेंनी म्हटल आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या दौ-यावरूनही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप रंगलंय. बीआरएस ही भाजपची बी टीम असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तर, ठाकरे गटाच्या या आरोपांना भाजप आमदार नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिलंय. राष्ट्रवादी ढ टीम म्हणजे ठाकरे गट असं नितेश राणे म्हणाले. दरम्यान आपण शेतकरी, कामगार, दलितांची बी टीम आहोत असं प्रत्युत्तर केसीआर यांनी दिले आहे.