धुळे : डॉ. सुभाष भामरे यांचा धुळे लोकसभा मतदार संघातून दणदणीत विजय झाला आहे. त्यांनी तब्बल २ लाखाच्या मताधिक्याने काँग्रेसच्या कुणाल पाटील यांचा पराभव केला आहे.
या मतदारसंघात बहुजन वंचित आघाडीमुळे काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता होती. भाजपकडून सध्याचे संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे निवडणुकीच्या रिंगणात होते. तर काँग्रेसने कुणाल पाटील यांना उमेदवारी दिली होती.
धुळे लोकसभा मतदारसंघातून २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच् सुभाष भामरे यांनी काँग्रेसच्या अमरिष पटेल यांचा ४,७२,५८१ मतांनी पराभव केला होता. तर याआधी २००९ च्या निवडणुकीत भाजपच्या प्रताप सोनवणे यांचा विजय झाला होता.