सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्याकडून अजित पवारांना मोठी ऑफर!

 सिन्नरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात  सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी  अजितदादांना एक मोठी ऑफर दिलीय. कोकाटेंनी अजित दादांना कोणती ऑफर दिलीय त्या ऑफरला अजितदादांनी काय उत्तर दिलंय पाहूयात. 

वनिता कांबळे | Updated: Oct 11, 2024, 11:17 PM IST
सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्याकडून अजित पवारांना मोठी ऑफर!   title=

Ajit Pawar : अजित पवारांनी बारामतीतून निवडणूक लढवणार नसल्याचे  संकेत दिल्यानंतर अजितदादा शिरूर,कर्जत-जामखेड मतदारसंघातून लढणार अशी चर्चा सुरु झाली होती. अजित पवारांनी तशी चाचपणी केल्याची माहितीही समोर आली होती. अजित पवार मतदारसंघाच्या शोधात आहेत म्हटल्यावर आता नेत्यांकडूनही अजितदादांना ऑफर येऊ लागल्या आहेत. आमदार माणिकराव कोकाटे यांनी अजित पवार यांना सिन्नरमधून विधानसभा निवडणूक लढवण्याची ऑफर दिलीय. अजितदादा सिन्नरमधून लढल्यास दिड लाख मतांनी निवडून देतो अशी ग्वाही माणिकरावांनी दिलीय.

कोकाटेंच्या ऑफरला अजितदादांनी नकार देत बारामतीमधूनच निवडणूक लढण्याचे स्पष्ट  संकेत दिलेत.. तसेच सिन्नर आणि बारामतीमध्ये कोणता आमदार जास्त मतांनी निवडून येतो.याची पैंज लाऊ असं दादांनी म्हटलंय.   उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीतून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. मी माझ्या घरट्यात जाऊन थांबतो, असं म्हणत अजित पवारांनी हे संकेत दिलेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी बारामतीतून लढणार नसल्याचे संकेत अप्रत्यक्षरित्या दिले होते. त्यानंतर अजित पवार शिरूर,कर्जत-जामखेड मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहणार असल्याची चर्चा सुरु होती. त्यातच आमदार माणिकराव कोकाटे यांनी अजित पवारांना सिन्नरमधून निवडणूक लढवण्याची ऑफर दिली.. त्याला अजित पवारांनी नकार देत बारामती माझी आहे आणि मी बारामतीचा आहे, असं म्हणतं बारामतीतून लढण्याचे संकेत दिलेत...

बारामतीतून लढणार नसल्याचं सांगितल्यावर काय प्रतिक्रिया येतील याचा अंदाज अजित पवारांनी घेतला असावा...सुनेत्रा पवारांच्या पराभवानंतर बारामती अनुकूल आहे की प्रतिकूल याची चाचपणी अजित पवारांनी केली. जनमानसाचा कानोसा घेऊन अजित पवारांनी यावेळीही बारामतीतूनच लढण्याचा निर्णय घेतलाय. या निमित्तानं अजितदादांना त्यांच्या सोबतच्या आमदारांचा मनाचा मोठेपणाही पाहायला मिळाला.

 सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षामध्ये प्रवेश केला. सयाजी शिंदे अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून विधानसभा निवडणुकीत प्रचार करणार आहेत. मुंबईमध्ये आयोजित विशेष पत्रकार परिषदेमध्ये सयाजी शिंदे अजित पवार पक्षात दाखल झाले. उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह इतरही नेते यावेळी उपस्थित होते. गेली 10 वर्षं आपण सामाजिक आणि पर्यावरणाची कामं करत असल्याचं यावेळी सयाजी शिंदे म्हणाले. तसंच काही प्रश्न बाहेर राहून न सोडवता सिस्टममध्ये जाऊन सोडवण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली. पर्यावरणाशी संबंधित अनेक कामं करण्यासाठी आपण अजित पवार पक्षात प्रवेश केल्याचं सयाजी त्यांनी सांगितलं. तर येत्या काळातही असेच मोठे प्रवेश पाहायला मिळतील असं या प्रसंगी अजित पवार यांनी जाहीर केलं.