सागर आव्हाड, झी मीडिया: अंधेरी पोटनिवडणुकीचा(anedheri east elections) निकाल आज लागत असून आजच्या निकालात मोठ्या प्रमाणात नोटाना मतदान करण्यात आलं आहे. हे मतदान भाजपने केलं आहे, अशी टीका देखील होत आहे. यावर भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांना विचारलं असता (Maharashtra Politics) ते म्हणाले की, ''कोणी कोणावर काय आरोप करावे यावर बंधने आणता येत नाही. लोकांना वस्तुस्थिती माहिती (Latest political update) आहे म्हणून यावर काहीही बोलू नये तसेच तिथल्या मतदारांची काय मानसिकता आहे हे देखील मला माहित नाही. पुण्यातील सर्किट हाऊस येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. यावर पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की नाना पटोले यांना आत्ता हळूहळू लोक गांभीर्याने घेणे बंद करणार आहे. पुढे जाऊन लोक म्हणतील कोण नाना पटोले'', असं यावेळी पाटील (Chandrakant patil) म्हणाले. (andheri east bypoll election 2022 chandrakant patil replys on nana patoles comment)
मागच्या आठवड्यात जिल्हयाच्या बैठकीत अनेक नेत्यांचा निधी हा कट झालं आहे यावर पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की, ''ज्या लोकांना कमी निधी मिळाला आहे अश्या लोकांच्या याद्या फायनल झाल्या आहेत. मी अजित पवार, दिलीप वळसे पाटील, दत्तात्रय भरणे यांचे निधी कमी केलं आहेत. जसं जसे निधी मिळतील तसे ते ती कामे यादीत घेण्यात येणार आहे.''
मित्रानेच केला घात! जिगरी दोस्ताचा अश्लील व्हिडीओ बनवत त्याने... पुण्यातील घटना!
''मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आज भाजपच्या वतीने जागर केलं जात आहे यावर पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की भाजपचे कार्यकर्ते हे नेहेमी तीन प्रकारच्या मुड मध्ये असतात. पाहिलं म्हणजे लोकांची सेवा, संघर्ष आणि निवडणुका हे काम करत असतात.आम्हला निवडणुका जवळ आल्या की कामाला लागा हे आमच्यासाठी नवीन नाही'',असं देखील यावेळी पाटील म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आजारी असताना ही चिंतन शिबिरात आले यावर पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की, ''सत्तेत राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच संघर्ष हा डीएनए त नाही. त्याला डीएनए असावा लागतो. स्वभाव असावा लागतो. नुसत्या वल्गना करून काहीही होत नाही. आम्ही जो संघर्ष केला. तो खरा संघर्ष आहे. आत्ता विरोधी पक्ष म्हणून अजित दादा रस्त्यावर उतरले आणि अमरण उपोषणाला बसले. असा बघण महाराष्ट्राला आवडेल'', असं देखील यावेळी पाटील म्हणाले.
धनंजय मुंडे यांनी जो 100 आमदारांबाबत विधान केला आहे त्याबाबत पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की कल्पना करणे काही चुकीचं नाही पण ते वास्तव्यात आणणे महत्वाचं असतं. भारतीय जनता पक्षाने जेव्हा जेव्हा अशी विधाने केली तेव्हा ती वास्तव्यास आणून दिली. राष्ट्रवादी काँग्रेसला कधीही 60 च्या पुढे आमदारांची संख्या करता आली नाही.जे 60 ते 70 च्या पुढे कधी गेले नाही ते काय वल्गना करत आहे.असा टोला देखील पाटील यांनी लगावला.