'हिंसक आंदोलनाला सत्ताधाऱ्यांची चिथावणीखोर वक्तव्यं कारणीभूत'​

अजित पवार यांनी संभाजी भिडेंवरही तोंडसुख घेतलंय

Updated: Jul 28, 2018, 11:52 AM IST
'हिंसक आंदोलनाला सत्ताधाऱ्यांची चिथावणीखोर वक्तव्यं कारणीभूत'​ title=

पुणे : मराठा समाजाची जी आंदोलन सुरु आहेत त्याला कुणाचं नेतृत्व नाही. तो एक प्रकारचा उद्रेक आहे, अशा परिस्थितीत सत्ताधाऱ्यांकडून चुकीची आणि  चिथावणी देणारी वक्तव्य केली जातात, असा आरोप राष्ट्रवादीचे नेत अजित पवार यांनी केला आहे. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस आणि चिंतामणी ज्ञानपीठ यांच्यावतीनं पुण्यात गुरुजन गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ, जेष्ठ नाट्यकर्मी कीर्ती शिलेदार, शास्त्रीय नृत्यांगणा सुचेता भिडे-चाफेकर तसचं प्रमिलाताई गायकवाडे यांच्या अजित पवारांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. 

संभाजी भिडेंवर टीका 

यावेळी, अजित पवार यांनी संभाजी भिडेंवरही तोंडसुख घेतलंय. 'संत ज्ञानेश्वर , तुकाराम यांच्यापेक्षा मनु श्रेष्ठ म्हटला जातो. समाजात काय पेरलं जातंय याचा विचार करण्याची वेळ आहे. याला आपण एकजुटीनं विरोध करणं आवश्यक आहे. गुरुजींबदद्ल आम्हाला आदर असायचा... मात्र हा गुरुजी देशात गरळ ओकण्याचं काम करत आहे' असं अजित पवार यांनी म्हटलंय. 

'भिडे वाड्यात महात्मा फुलेंनी पहिली शाळा सुरु केली. मात्र त्याच भिडे आडनावाशी साधर्म्य असणारी एक व्यक्ती अमुक एका बागेतील आंबे खाल्ल्यानं मुलगे होतात असं सांगतात. आपण जे बोललो त्याचा त्यांना खेदही नाही. पुन्हा एकदा महिलांना चूल आणि मुल यातच जुंपण्याचा डाव आहे की काय? अशी शंका येते' असंही त्यांनी म्हटलंय.