Nagpur Crime News: फेसबुकवर झालेल्या मैत्रीमुळे महिलेचे आयुष्य उद्धवस्त झाले आहे. फेसबुक फ्रेंडवर विश्वास ठेवला आणि महिलाचा विश्वासघात झाला. मध्य प्रदेशातील महिलेवर नागपुर येथे सामुहिक बलात्कार झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. सामुहिक बलात्काराच्या या घटनेमुळे नागपुर शहरात खळबळ उडाली आहे.
सीताबर्डी परिसरात 25 जूनला रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. पिंटू गजभिये आणि कार्तिक चौधरी अशी अटक आरोपींची नावे आहेत. पीडित महिला विवाहीत आहे. पीडिता आपल्या पतीपासून विभक्त राहते. तिला दोन मुले देखील आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या या महिलेला आरोपींने आपले सावज बनवले
पीडित महिलेची आरोपींपैकी एक असलेल्या पिंटू गजभिये याच्याशी फेसबुक या सोशल साईटवर मैत्री झाली होती. तीन वर्षांपासून हे दोघे फेसबुक फ्रेंड आहेत. या महिलेला नोकरीचे अमिश दाखवून आरोपींनी या महिलेला नागपुर येथे बोलावले. यानंतर आरोपींनी या महिलेवर बलात्कार केला.
25 जूनला महिला बसने मध्यप्रदेशातून नागपूर स्थानकावर आली. रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ही महिला नागपुर येथे पोहचली. यावेळी पिंटू गजभिये तिला घेण्यासाठी नागपूर स्थानकावर आला. तिथून आरोपीने तिला कारमध्ये बसवून नागपूर ग्रामीण येथील सावनेरमध्ये नेले. येथील एका रिसॉर्टमध्ये आरोपींनी एक रुम बुक केली होती. आरोपी महिलाला घेवून या रुम मध्ये आला. यावेळी त्याचा मित्र कार्तिक चौधरी देखील येथे उपस्थित होता. आरोपींनी महिलेला शीतपेयातून गुंगीचे औषध टाकून दोघांनी रात्रभर तिच्यावक सामूहिक बलात्कार केला. सकाळी शुद्धीवर आल्यानंतर बलात्कार झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून दोघांवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी तक्रारीनंतर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून इतर आरोपींचा यात सहभाग आहेत का? याची चौकशी पोलीस करत आहेत. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
नागपुर येथे अजनी पोलीस स्टेशन हद्दीतील एका शाळेमध्ये घुसून एका विकृतानं अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत अश्लील कृत्य करण्याचे प्रयत्न केला होता. 23 फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजून 7 मिनिटांनी शाळेच्या आत ही घटना घडली होती. सुरुवातीला विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी घडलेल्या प्रकाराबद्दल पोलिसांकडे तक्रार देणे टाळले होते. मात्र, घटनेची माहिती पोलिसांना कळल्यानंतर पोलिसांनी पीडित विद्यार्थिनी आणि शाळा प्रशासनासोबत संपर्क साधून प्रकरणाची नोंद करत विनयभंगाचा गुन्हा नोंदविला होता.