Pune Crime News : पुणेकराला उत्तराखंडच्या मुलीनं लुटलं आहे. व्यवसायात भगिदाराचे आमिष दाखवून उत्तराखंड येथील मशरूम गर्ल दिव्या रावत आणि तिचा भाऊ राजपाल रावत याने पुण्यातील एका माणसाची तब्बल 57,58,197 रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. पुण्यातील पौंड ग्रामीण पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे.
याबाबत जितेंद्र नंदकिशोर भाखाडा यांनी सन 2022 मध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास करत डेहराडूनमधील मोथारावाला येथे राहणारी दिव्या रावत आणि तिचा भाऊ राजपाल रावत याला अटक केली आहे.
तक्रारदार जितेंद्र नंदकिशोर भाखाडा यांची प्रिक्वेल सिस्टम्स या नावाची कंसलटंसीचे काम करणारी फर्म आहे. त्याद्वारे ऑनलाईन आणि फोनच्या मध्यमातुन ते हे फर्म चालवित होते. तसेच जितेंद्र नंदकिशोर भाखाडा यां यांची पत्नी नेहा हिचेही नमस्या प्रिंसीजन्स नावाची कंसलटंसीचे काम करणारी फर्म असून दोघे नवरा बायको हे फर्म चालवतात.मात्र जितेंद्र नंदकिशोर भाखाडा हे आजारी झाल्यावर त्यांना तांत्रिकशेती उदयोगात जायचे होते. म्हणुन त्यांनी सोशल मीडियाचा वापर करून त्यावर विविध ठिकाणी उद्योग शोधत असताना फेसबुकवर डेहराडून या ठिकाणी मशरूमची तांत्रिक शेती बद्दलची माहिती त्यांनी मिळाली. त्यांनी शकुंतला रॉय यांच्याशी फोनवर चर्चाकरून संपूर्ण माहिती घेतली त्यानंतर त्यांनी फिर्यादी यांना 5 ते 6 दिवसांच्या प्रशिक्षणासाठी डेहराडून मधील मोथारावाला याठिकाणी बोलविले.
जितेंद्र नंदकिशोर भाखाडा जानेवारी 2019 मध्ये मोधारावाला डेहराडून येथे प्रशिक्षणासाठी गेल्यावर तेथे त्यांना शकुंतला रॉय हीची बहीण दिव्या रावत भेटली. तीने मशरूमच्या संपुर्ण तांत्रिकशेतीचे प्रशिक्षण दिले. प्रशिक्षण घेतल्यानंतर फिर्यादी हे पुण्यात आले आणि घरी बसुनच दिव्या रावत हिच्याशी ओळख झाल्याने तिच्या सोम्या फुडस प्रा. लि. तसेच कोरडीसेफ फिटनेस, द माउटन मशरूम या फर्म बाबत मदत केली. तेव्हा नेहेमी बोलत असताना दिव्या रावत यांनी आप काम अच्छा करते हो, आप मेरे मिशन के लीये कंसलटन्सीका काम करोगे क्या और उसके बाद में मैं तुम्हे पार्टनरशीप में लुंगी'''' अस सांगितले तेव्हा फिर्यादी यांनी त्याला होकार देखील दिलं आणि तेव्हा 2019 ते 2022 या कालावधीत काम करून तसेच गुंतवणूक करून जवळपास 57,58,197 रूपये परत न देता विश्वासघात करून फसवणुक केली आहे.
याबाबत पौड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज कुमार यादव म्हणाले की 2022 ला गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर 2023 साली पुण्यातून पथक उत्तराखंड येथे पाठवल्यानंतर तिथं संपूर्ण तपास करण्यात आलं आणि तपास केल्यावर दिव्या रावत आणि त्याचा भाऊ याला राजपाल रावत याला 9 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली आणि न्यायालयात हजर केल्यावर 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.