ताम्हाणी घाटात अडकलेल्या ५० पर्यटकांची सुखरूप सुटका

रायगडमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या ५० पर्यटकांचा काळ आला होता, मात्र वेळ आली नसल्यानं त्या सर्वांना सुखरुप वाचवण्यात आलं. 

Updated: Jun 26, 2017, 07:19 PM IST

रायगड : रायगडमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या ५० पर्यटकांचा काळ आला होता, मात्र वेळ आली नसल्यानं त्या सर्वांना सुखरुप वाचवण्यात आलं. 

रायगडमधल्या ताम्हणी घाटात वर्षा सहलीसाठी हे पर्यटक आले होते. भिरा देवकुंड नजिकच्या नदीपात्रापलीकडे हे सर्वजण अडकले होते.  

दुथडी भरुन वाहणारी नदी  ओलांडणं त्यांना अशक्य होऊन बसलं होतं. मात्र पोलीस आणि राफ्टर्स यांनी दोर टाकून या सर्वांना सुखरुप वाचवलं. या दिव्यातून सहीसलामत बचावल्यानंतर, या सर्व पर्यटकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.