बारामतीत हैदराबादच्या नवाबाचा घोडा! किंमत 11000000... भारतातील एकमेव अश्व

बारामतीच्या कृषी प्रदर्शनात हैदराबादच्या नवाबाचा 11 कोटींचा घोडा चर्चेत आसला आहे. हा घोडा बघायला गर्दी लोटली आहे.

वनिता कांबळे | Updated: Jan 19, 2025, 05:18 PM IST
बारामतीत हैदराबादच्या नवाबाचा घोडा! किंमत 11000000... भारतातील एकमेव अश्व title=

Baramati Krushik 2025 : मर्सिडीज बेंज किंवा बीएमडब्ल्यू कारची किंमत अगदी फार तर तीन कोटीपर्यंत असते. अलीकडे ग्रामीण भागातील उद्योजक देखील अशा महागड्या कार खरेदी करतात. या कारची किंमत फार फार तर 5 कोटीपर्यंत असते. परंतु फक्त शौक म्हणून पाळलेल्या एखाद्या जिवंत घोड्याची किंमत जर 11 कोटी असेल तर? हो बारामतीत सध्या हा 11 कोटींचा घोडा चर्चेत आला आहे. 11 कोटी रुपयांमध्ये रॉल्स रॉयस ही सर्वात नहागडी कार खरेदी करता येईल.  

बारामतीच्या एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनात हैदराबादच्या नवाबाचा सोनेरी रंगाचा एक घोडा सगळ्यांचे लक्ष वेधून घेत असून हा घोडा पाण्यासाठी शेतकऱ्यांची व अश्वप्रेमींची गर्दी झाली आहे विशेष म्हणजे या घोड्याची मालेगावच्या यात्रेत 11 कोटींची किंमत सांगितली होती.

हैदराबादचे नवाब अब्दुल हद्रफ यांचा हा घोडा असून त्याच्या डोळ्याचा व शरीराचा रंग एक सारखा असल्याने हा घोडा अतिशय आकर्षित करत आहे. हा घोडा आठ वर्षाचा असून पुष्करच्या यात्रेतून हा घोडा आणि घोडी आम्ही खरेदी केल्याचे नवाबांनी सांगितले. हा घोडा आम्ही फक्त मालेगावच्या यात्रेत नेला होता आम्ही शौक म्हणून घोडे पाळतो इथे रणजीत पवार यांच्या खास आमंत्रणावरून आम्ही आल्याचे त्यांनी सांगितले. हा घोडा देशात एकमेव असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. हा काठेवाडी घोडा असून या घोड्याची इतर वैशिष्ट्ये मात्र समजली नाहीत.

ऋतुमानानुसार या घोड्याचा खुराक वेगवेगळा आहे.  मारवाडी पठडीचा हा घोडा देशभरात एकमेव असल्याचा दावा केला जात आहे. मालेगावच्या यात्रेत या घोड्यावर 11 कोटींची बोली लागली आहे.  या घोड्यासारखीच रंगाची एक घोडी नवाबांकडे आहे.  डोळ्यांचा वैशिष्ट्यपूर्ण रंग आणि शरीराचा रंग एक सारखाच सोनेरी आहे.