Google Trends: डिसेंबर महिना सुरू झाला आहे. या वर्षात अनेक गोष्टी घडल्या घटना घडल्या. आता नवीन वर्ष सुरू होईल. या वर्षात काय काय घडलं याची झलक तुम्हाला गुगल दाखवते. या वर्षात गुगलवर लोकांनी काय सर्च केले याचा एक आढावाच गुगलकडून दाखवला जातो. दरवर्षी गुगलकडून यासंदर्भातील आकडेवारी जारी केली जाते. गुगलवर आर्थिक नियोजनापासून ते रेसिपीपर्यंत सर्च केले जाते. तर, यंदा भारतीयांनी कोणत्या कोणत्या रेसिपी सर्च केल्या हे गुगलने दाखवलं आहे.
भारतात गुगलवर सर्च करण्यात आलेल्या सर्वाधिक रेसिपीची यादीच जाहीर केली आहे. कोणत्या आहेत या रेसिपी हे जाणून घेऊया.
पॅशन फ्रुट, व्हॅनिला, वाईन आणि वोडका यांचे मिश्रण असलेले हे कॉकटेल आहे. पॉर्न स्टार मार्टिनी कॉकटेल भारतात मोठ्या प्रमाणात सर्च करण्यात आलेले आहे.
आंब्याचे लोणचे हे भारतीयांचा जीव की प्राण आहे. भातासोबत किंवा पराठ्यासोबत लोणचं खाल्लं जातं. आंब्याचं लोणचं कसं बनवायचं हे 2024 मध्ये सर्वाधिक सर्च करण्यात आलं होतं.
धनिया पंजिरी हा गोड पदार्थ असून भगवान श्रीकृष्णासाठी नैवेद्य म्हणून बनवली जाते. जन्माष्टमीच्या दिवशी हा पदार्थ बनवला जातो.
Ugadi Pachadi हा एक विशेष पदार्थ आहे. ही डिश खासकरुन तेलगु नव वर्षाला केली जाते. कडिलिंबाची पाने, कैरी, गुळ, मिरपूड, खोबरं आणि मीठ वापरून हा पदार्थ केला जातो.
पंचामृत हे तीर्थ आहे. भारतात पूजेच्या दिवशी तीर्थ म्हणून पंचामृत केले जाते. दूध, दही, तुळशीची पाने, मध, गंगा जल यापासून पंचामृत तयार केले जाते.
Ema Datshi हा एक रस्सा प्रकार आहे. काळिमिरी आणि चिज पासून हा पदार्थ केला जातो. भारतात अभिनेत्री दिपीका पदुकोणमुळं प्रसिद्ध झाला होता.
Flat White हा एक कॉफी प्रकार असून एक्सप्रेसो आणि स्टीम मिल्कपासून तयार केला जातो. मार्च 2024मध्ये गुगलने डुडलदेखील काढले होते.
कंजी हे उत्तर भारतात बनवण्यात येणारे पेय आहे. पाणी, गाजर, बीट, मोहरी आणि हिंग वापरून हे पेय बनवण्यात येते
दिवाळीत महाराष्ट्रात घराघरात बनवला जाणारा पदार्थ म्हणजे शंकरपाळी. भारतात 2024 मध्ये शंकरपाळी हा पदार्थ सर्वाधिक सर्च करण्यात आला.
Chammanthi Podi ही एका प्रकारची चटणी आहे. साखर, चिंच,आलं,कांदा वापरुन केरळात ही चटणी केली जाते.