Mahashivratri 2025: हिंदू धर्मात महाशिवरात्री या सणाला खूप महत्त्व आहे. दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्दशीला महाशिवरात्री सर्वत्र साजरी केली जाते. यंदा महाशिवरात्री हा सण बुधवारी, 26 फेब्रुवारी रोजी साजरा केला जाणार आहे. भगवान शिव हे फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्दशी तिथीला निराकारातून भौतिक रूपात आले, असं मानलं जातं. या दिवशी भगवान शंकर यांचा माता पार्वतीशी विवाह झाला त्यामुळे या दिवशी मोठ्या संख्येने शिवभक्त उपवास करतात आणि महाशिवरात्रीची पूजा करतात.
महाशिवरात्री हा दिवस पूर्णपणे भगवान शंकरला समर्पित केला जातो. या दिवशी भगवान शिव प्रसन्न होऊन भाविकांना आशीर्वाद देतात, अशी मान्यता आहे. म्हणूनच या खास दिवशी लोक उपवास करतात, रुद्राभिषेक करतात आणि शिवमंदिरांना भेट देतात. भगवान शंकराचा आशीर्वाद मिळावा यासाठी शिवभक्तही विविध प्रकारचे उपाय करत असतात. अशातच काही लोक भगवान शंकराला लवंगाची जोडी अर्पण करतात. असे मानले जाते की भगवान शंकराला लवंग खूप आवडते. जाणून घेऊया, शिवलिंगावर लवंगाची जोडी का अर्पण केली जाते?
शिवपुराणासह अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये शंकराला लवंग अतिशय प्रिय असल्याचा उल्लेख आहे. लवंग हे शिव-शक्तीचे प्रतीक आहे, असे मानले जाते. तसेच, ज्योतिषशास्त्रात लवंगला उर्जेचा कारक म्हटले गेले आहे. म्हणून, महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर लवंग अर्पण करण्याची परंपरा आहे. लवंगाची जोडी अर्पण केल्याने भक्ताच्या मनोकामना पूर्ण होतात, अशी लोकांची धारणा आहे.
शिवलिंगावर लवंगाची जोडी अर्पण केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात. ज्यांना पैशांची अडचण आहे त्यांनी शिवलिंगाला लवंगाची जोड अर्पण करावी, यामुळे व्यक्तीला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही आणि सुख-समृद्धी वाढत जाईल.
भगवान शंकराच्या पूजेमध्ये लवंगाचा समावेश केल्याने मानसिक समस्या दूर होतात आणि मन शांत राहण्यास मदत होते. याव्यतिरिक्त, नकारात्मक विचार आणि गोष्टीसुद्धा दूर होण्यास मदत होते.
शिवलिंगावर लवंग चढवल्याने व्यक्ती वाईट शक्तींपासून वाचते आणि भगवान शंकराची अपार महिमाही प्राप्त होते.
भगवान शंकराची पूजा करताना लवंगाच्या वापरामुळे ग्रह आणि कुंडलीतील दोषही शांत होतात. तसेच, शंकराला लवंग अर्पण केल्याने कुंडलीतील शनि, राहू आणि केतूच्या दोशांचा प्रभाव कमी होतो.
(Disclaimer : या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही.)