तुम्हीसुद्धा अंड्यातील पिवळा भाग फेकुन देता? फायदे जाणून कधीच करणार नाही ही चूक

अनेकजण हे अंड्यातील पिवळा बलक म्हणजेच योक (Egg Yolk) फेकून देण्याची चूक करतात. मात्र, यात अनेक फायदेशीर गुणधर्म लपलेले आहेत. नक्की जाणून घ्या, पिवळा बलक खाण्याचे फायदे.

Updated: Jan 29, 2025, 11:37 AM IST
तुम्हीसुद्धा अंड्यातील पिवळा भाग फेकुन देता? फायदे जाणून कधीच करणार नाही ही चूक title=

Benefits of Egg Yolk: अंड्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन असल्याचं आपल्या सर्वांनाच माहित आहे. अनेकजण आपल्या आहारात अंड्याचा समावेश करतात. परंतु, काहींना अंड्यातील पिवळा बलक खाण्यास अजिबात आवडत नाही. अनेकदा ते अंडी खाताना अंड्यातील तो पिवळा भाग ते फेकून देतात. पण, खरंच, अंड्यातील बलक खाण्याचं टाळणं हे योग्य आहे का? नक्की जाणून घ्या, अंड्यातील पिवळा बलक खाण्याचे फायदे.

अंड्यातील पिवळ्या बलकला योक (Egg Yolk) असंसुद्धा म्हटलं जातं. बलकात भरपूर प्रमाणात पोषकत्त्व असतात. या पिवळ्या बलकाचे सेवन केल्याने स्वास्थ्यासंबंधी बऱ्याच समस्या दूर होतात. कॅल्शियम, मैग्नीशियम, कॅरोटीनॉयड्स, ल्यूटिन, जॅक्सँथिन आणि ओमेगा-3 फॅटी एसिड आढळतात. अंड्यातील हा पिवळृा बलक खाल्याने स्नायूंचा विकास होण्यास मदत होते. मेंदू आणि हृदयाच्या स्वास्थ्यासाठी तर हा पिवळा बलक अत्यंत फायदेशीर आहे. अंड्यातील पिवळा बलक डोळ्यांसाठी तसेच केस आणि नखांसाठी अत्यंत उपयुक्त मानला जातो. 

अंड्यातील पिवळ्या बलकाचे फायदे

मोठ्या प्रमाणात पोषकत्त्व

अंड्यातील पिवळा बलक हा व्हिटॅमिन ए, डी, ई, के, बी1, बी2, बी5, बी6, बी9, बी12 यांचा उत्तम स्त्रोत आहे. अंड्यातील या भागात फोलिक अ‍ॅसिड, सेलेनियम, लोह आणि झिंक असे आरोग्यासाठी आवश्यक असणाऱ्या घटक समाविष्ट असतात. 

प्रोटीनचा उत्तम स्त्रोत

अंड्यातील पिवळा बलक हा प्रोटीनचा उत्तम स्त्रोत आहे कारण यात प्रोटीनचे मुबलक प्रमाण आढळते. स्नायूंच्या निर्मितीसाठी आणि त्यांच्या स्वास्थ्यासाठी अंड्यातील पिवळा बलक हा उपयुक्त मानला जातो. 

हृदयाच्या स्वास्थ्यासाठी फायदेशीर

अंड्यातीस प्रोटीनयुक्त पिवळ्या बलकात ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड्स आणि फॉस्फोलिपिड्सचे भरपूर प्रमाण असते. याचा हृदयाच्या स्वास्थ्यासाठी चांगलाच फायदा होतो. अंड्याचे योग्य प्रमाणात सेवन केल्याने शरीरातील कोलेस्ट्रोलचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. 

डोळ्यांचे स्वास्थ्य

अंड्याच्या पिवळ्या बलकात ल्यूटिन आणि जॅक्सँथिन सारखे अ‍ॅंटीओक्सीडेंट्स असतात जे डोळ्यांच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत उपयोगी असतात. त्यामुळे अंड्याच्या पिवळ्या बलकाचे सेवन केल्याने वाढत्या वयासोबत उद्भवणाऱ्या डोळ्यांच्या समस्या दूर राहण्यास मदत होते. 

त्वचा आणि केसांसाठी लाभदायक

अंड्यातील पिवळ्या बलकात बायोटिन आणि फॅटी अ‍ॅसिड्स असतात आणि हे घटक मजबूत आणि रेशमी केसांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी कारणीभूत ठरतात. तसेच, पिवळ्या बलकातील घटक हे त्वचा हायड्रेटेड ठेवण्यासाठी आणि कोमल होण्यासाठी मदत करतात. 

मेंदूसाठी फायदेशीर

अंड्याच्या बलकातील कोलिन हे पोषकत्त्व मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी अत्यंत फायदेशीर मानलं जातं. यामुळे मानसिक स्वास्थ्यात सुधार होण्याससुद्धा मदत होते. 

हे ही वाचा: नैसर्गिक प्रजनन क्रियेला शह देत स्त्री-पुरुषाशिवायच जन्माला येणार बाळ? शास्त्रज्ञांचा खळबळजनक दावा

योग्य प्रमाणात अंड्यातील पिवळ्या बलकाचे सेवन

अंड्याच्या पिवळ्या बलकाचे योग्य प्रमाणात सेवन करणे अत्यंत गरजेचे आहे. प्रमाणापेक्षा याचे अधिक सेवन केल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते तसेच, हृदयाशी संबंधित आजारांचासुद्धा धोका वाढतो. जर तुम्हाला अंड्याची अ‍ॅलर्जी असेल तर अंड्याचे सेवन करणे टाळा.

(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)