महाराष्ट्रात सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीची लगबग पाहायला मिळत आहे. या दरम्यान राजकीय व्यक्ती वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहेत. राजकीय व्यक्तींमध्ये टोपण नाव असणारे कोल्हापुरचे आमदार सतेज पाटील हे एक उत्तम उदाहरण आहे. सतेज पाटील कोल्हापुरचं काय तर संपूर्ण महाराष्ट्र सतेज उर्फ बंटी पाटील या नावाने ओळखतं. अशावेळी त्यांना 'बंटी' हे नाव कसं पडलं आणि टोपण नाव ठेवताना पालकांनी देखील कोणता विचार करावा? त्याचबरोबर अतिशय युनिक आणि हटके टोपण नावे आपण आज या लेखात पाहणार आहोत.
कोल्हापुरचे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी यावर उत्तर देताना म्हटलं की, मला लहानपणापासूनच घरी 'बंटी' या टोपण नावानेच हाक मारायचे. त्यामुळे ते नावच लोकप्रिय झालं. अगदी 10 ते 15 वर्षात लोकांना माझ सतेज पाटील हे नाव माहित पडल्याचं ते स्वतः सांगतात. 2004 ला जेव्हा पहिल्यांदा विधानसभेत प्रवेश केला तेव्हा मला 4 ते 5 वर्षे कुणी बोलवतचं नव्हते किंवा हाक मारत नव्हते. मात्र त्यानंतर ज्येष्ठ राजकारणी लोकांनी मला सांगितलं की, आता बंटी नको सतेज पाटील म्हणायला सुरुवात करा. पण कोल्हापूरमध्ये तर माझी 'बंटी' ही ओळख कायमच राहील.
टोपण नाव म्हणजे एखाद्या व्यक्तीचे अनौपचारिक नाव. हे नाव त्याच्या मुळ नावावरुन ठेवले जाते किंवा वेगळे ठेवले जाते. अनेकदा हे नाव कुटुंबातील व्यक्तींकडून किंवा जवळच्या मित्रपरिवाराकडून ठेवले जाते. या नावात प्रेम आणि अतिशय साधे सरळ असा विचार असतो. उदाहरणार्थ, मराठी बालकलाकार मायरा वायकुळला 'परी' या टोपण नावाने संबोधलं जातं. अशाच सुंदर अशा टोपण नावांचा तुम्ही विचार करु शकता.