हल्ली बाजारात अनेक एअर टाइट कंटेनर डब्बे मिळतात. पण तरीही काही लोकं आजही स्टीलचे किंवा नॉर्मल डब्ब्यांचा वापर करतात. पण या डब्यांचे सर्वात मोठे दुष्परिणाम म्हणजे या डब्ब्यांमधून तेल बाहेर पडतं. या डब्यातून जर भाजी नेली तर तेल संपूर्ण बाहेर निघून येतं. हे तेलं तुमची संपूर्ण डब्याची बॅग किंवा कधी कधी ऑफिसची बॅग पण खराब करते. जर तुम्ही देखील या समस्येचा सामना करत असेल तर हे सोपे हॅक्स फॉलो करा. या ट्रिक्सच्या मदतीने स्टीलचा डबा देखील स्पिलप्रूफ होऊन जाईल.
अनेकदा ही ट्रिक आपल्या घरातील मोठी मंडळी करतात. यासाठी ते आधी प्लास्टिकची पिशवी वापर असतं. पण आता तुम्ही फॉइल पेपरची मदत घेऊ शकता. ऍल्युमिनियम फॉइल पेपरच्या मदतीने तुम्ही डब्बा एअर टाइट करु शकता.
यासाठी लंच बॉक्समध्ये भाजी भरल्यानंतर त्यावर फॉइल पेपर त्या आकाराचा कापून ठेवावा आणि मग त्याचं झाकण लावावं यामुळे तेल किंवा भाजीतील पाणी बाहेर येणार नाही.
फॉइल पेपरचे चारही तुकडे इतके मोठे असावेत की टिफिनचे झाकण बंद करूनही ते थोडेसे बाहेरच राहतील. जेणेकरुन झाकण बंद होते जसे की ते पॅक एअर टाईट आहे. अशा प्रकारे तुमच्या भाजीचे तेल निघणार नाही आणि टिफिन घाण होणार नाही.
कोणत्याही गोष्टी एअर टाइट करण्यासाठी कायम रब्बरचा वापर केला जातो. नॉर्मल टिफिनला रब्बरच्या मदतीने एअर टाइट करु शकता. यासाठी रब्बर थोडा मोठा असावा याची काळजी घ्या. यापद्धतीने डब्बा भरल्यास पाणी देखील बाहेर येणार नाहीत. तसेच रब्बरचा वापर करताना ते स्वच्छ धुणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. तसेच रब्बर तेलकट होतो अशावेळी तो स्वच्छ न धुतल्यास त्यामधून तेलकट वास येऊ शकतो.
डब्बा भरताना अनेकदा आपण घाईघाईत भाजी भरतो. पण टिफिनचं झाकण नीट लागलं नाही तर वरील टिप्सचा वापर केल्यावरही काहीही फायदा होणार नाही. घरातून निघण्यापूर्वी डब्याचे झाकण आणि टिफिन बॅगची चैन नीट लागली आहे की नाही याची काळजी घ्यावी.
बाजारात एअर टाइट कंटेनर किंवा डब्बे उपलब्ध आहेत. तुम्ही त्याचाही वापर करु शकता. पण या कंटेनरची आणि डब्ब्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. बाजारात काही प्लास्टिकची झाकणंही उपलब्ध होतात जे तुम्ही कोणत्याही तुमच्या डब्ब्याला लावू शकता.