गालाव्यतिरिक्त शरीराच्या या भागावरही पडते खळी? 'हा' कोणता आजार तर नाही ना?

गालावर खळी पडल्यामुळे चेहऱ्याच सौंदर्य वाढतं. पण तुम्हाला माहित आहे का? की, खळी फक्त गालावरच पडते असं नाही. शरीराच्या इतर भागांवरही खळी पडते. पण ही नैसर्गिक गोष्ट आहे की? हा कोणता आजार आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jan 27, 2025, 10:47 AM IST
गालाव्यतिरिक्त शरीराच्या या भागावरही पडते खळी? 'हा' कोणता आजार तर नाही ना? title=

चेहऱ्यावर डिंपल असणे हा नैसर्गिक सौंदर्याचा एक भाग आहे. विशेषतः ज्या मुलींना खळी पडतात, त्यांचे सौंदर्य अधिकच वाढते. असेही म्हटले जाते की, ज्या लोकांच्या चेहऱ्यावर खळी पडतात ते खूप भाग्यवान असतात. पण तुम्हाला माहिती आहे का, की गालांव्यतिरिक्त शरीराच्या इतर कोणत्या अवयवांवर खळी पडते आणि त्यामागील कारण काय आहे. 

खळी चेहऱ्याच सौंदर्य वाढवतं? 

तुम्ही पाहिले असेल की, ज्या मुलींच्या चेहऱ्यावर खळी पडतात त्या हसल्यावर आणखी सुंदर दिसतात. पण खळी पडण्याचे कारण केवळ अनुवांशिक नाही तर ते स्नायूंशी देखील संबंधित आहे. जगभरात असे अनेक पुरुष आणि महिला सेलिब्रिटी स्टार आहेत जे त्यांच्या खळी आणि हास्यासाठी खूप प्रसिद्ध आहेत.

खळी अनुवांशिक असते का? 

काही लोकांचा असा विश्वास आहे की डिंपल हे अनुवांशिक असतात, जे पहिल्या पिढीपासून दुसऱ्या पिढीला वारशाने मिळतात.असे अनेक वेळा दिसून आले आहे की, पालकांच्या गालावर खळी असते त्यांच्या मुलांच्या गालावरही खळी असते. पण हे सगळ्यांच्याबाबतीत असतेच असे नाही. 

स्नायूंमुळे खळी तयार होतात का?

याशिवाय, काही लोकांचा असा विश्वास आहे की गालात असलेले स्नायू इतरांपेक्षा लहान असतात, त्यामुळेच गालावर खळी दिसतात. गालातील या स्नायूला झिगोमॅटिकस म्हणतात. जर हा स्नायू विभागला गेला किंवा लहान झाला तर गालावर खळी येऊ शकतात. चेहऱ्यावरील सौंदर्य आणखी वाढवतात.

शरीराच्या कोणत्या भागावर खळी पडते?

गालांव्यतिरिक्त, शरीरातील फक्त एकाच ठिकाणी खळी पडते. गालांव्यतिरिक्त, चेहऱ्याच्या हनुवटीवरही खळी तयार होते. माहितीनुसार, हनुवटीवरील खळी हे अनुवांशिक नसून हाडे एकमेकांशी न जोडल्यामुळे तयार होतात. विज्ञानानुसार, अनेक वेळा आईच्या पोटात वाढणाऱ्या बाळाच्या हनुवटीच्या डाव्या आणि उजव्या बाजूची हाडे एकत्र येत नाहीत, ज्यामुळे खळी पडतात.  गाल आणि हनुवटी वगळता शरीराच्या इतर कोणत्याही भागावर खळी दिसू शकत नाहीत.