नवी मुंबई : येथील एपीएमसीतले भाजीपाला व्यापारी अरुण मेनकुदळे यांच्या घरी चोरी झाली आहे.
सीसीटीव्हीतमध्ये ही चोरी कैद झाली आहे.
कशी झाली चोरी ?
कुरिअर एजंट असल्याचं सांगून 6 जण त्यांच्या घरात शिरले. रिव्हॉल्वरचा धाक दाखवून 2 कोटी 9 लाख 36 हजारांचा ऐवज त्यांनी लुटून नेला. या चोरट्यांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. महिलेनं घराबाहेर पहारा ठेवला काही वेळाने ती निघून गेली. मग चोरी करून हे पाच जणही निघून गेले.
सीसीटीव्हीत या चोरट्यांचे चेहरे कैद झाले आहेत. सीसीटीव्ही फूटेजच्या माध्यामातून पोलीस आता चोरट्यांचा शोध घेत आहेत.