'मी बंगळुरू सोडलं नाही आणि ...' Zomato प्रकरणी महिलेची पहिली प्रतिक्रिया

झोमॅटो (Zomato) डिलिव्हरी बॉय आणि बंगळुरू महिला ग्राहकादरम्यान मारहाण झाल्याच्या प्रकरणाला नवं वळण      

Updated: Mar 19, 2021, 10:37 AM IST
'मी बंगळुरू सोडलं नाही आणि ...' Zomato प्रकरणी महिलेची  पहिली प्रतिक्रिया title=

मुंबई :  झोमॅटो (Zomato) डिलिव्हरी बॉय आणि बंगळुरू महिला ग्राहकादरम्यान मारहाण झाल्याच्या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. झोमॅटो मारहाण प्रकरणी संबंधित महिला हितेशा चंद्राणीने (Hitesha Chandranee)पहिली प्रतिक्रिया दिली. दरम्यान महिला बंगळुरू सोडून गेली असल्याच्या चर्चांना देखील सर्रास पसरत होत्या. पण आता या सर्व चर्चांना हितेशा यांनी पूर्णविराम दिला आहे. पोलिसांच्या चौकशीपासून वाचण्यासाठी हितेशा यांनी शहर सोडलं असं समोर आलं. 

पण आता हितेशा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मी पोलिसांच्या चौकशीत सहकार्य  करत आहे. असं वक्तव्य हितेशा यांनी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून केलं आहे. हितेशा यांची ही पोस्ट सध्या तुफान व्हायरल  होत आहे.   झोमॅटो प्रकरण सध्या चांगलचं गाजत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by HITESHA | Beauty Influencer (@hiteshachandranee)

'मी पोलिसांना चौकशीत सहकार्य करत आहे. मी  बंगळुरू सोडलेलं नाही. मला अनेक जण त्रास देत आहेत. शिवाय माझ्यासोबत गैरव्यवहार देखील होत आहे. धमक्यांचे फोन येत आहेत.' अशी प्रतिक्रिया  महिलेने सोशल मीडियाच्या माध्यमातून  दिली आहे. .

हितेशा विरोधात कलमांतर्गत गुन्हा दाखल 
झोमॅटो डिलिव्हरी बॉय कामराज याने केलेल्या तक्रारीमुळे बंगलुरूच्या इलेक्ट्रॉनिक सिटी पोलीस स्टेशनमध्ये हितेशा चंद्राणी विरोधात एफआयाआर दाखल करण्यात आली आहे. हितेशा विरोधात आयपीसी कलम 355(हल्ला), 504(अपमान) आणि 506 (धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

त्या दिवशी नेमकं काय घडलं? 
 कामराजने सांगितलं की, 'हितेशाने जेवण ताब्यात घेतले परंतू तिने पैसे देण्यास नकार दिला. ती म्हणाली की ती झोमॅटो कस्टमर सपोर्टशी बोलत आहे. हितेशाने यानंतर त्याला अश्लिल शिव्या दिल्या व जोरजोरात ओरडायला लागली. तर झॉमॅटो सपोर्टने कामराजला ऑर्डर कॅन्सल केल्याचे सांगितले. यामुळे कामराजने तिला जेवण परत करण्यास सांगितले. जेव्हा तिने ते मागे देण्यास नकार दिला तेव्हा तिथून कामराज निघून जात होता. 

तरी देखील ती त्याला शिव्या देतच होती. अचानक तिने डिलिव्हरी बॉयवर चप्पल उगारली आणि मारायला सुरुवात केली. मी तिला रोखण्यासाठी हात पुढे केला. यावेळी तिने चुकून तिचाच हात नाकावर मारला. मी फक्त तिचा वार रोखण्यासाठी हात पुढे केला होता. तिच्या बोटातील अंगठी तिच्या नाकावर लागली. तिचा व्हिडीओ पाहिल्यास त्यामध्ये स्पष्ट दिसेल असेही त्याने पोलिसांना सांगितले.  तिच्या नाकावर जखम झाली ती अंगठीमुळे झाली आहे, मी मारल्यामुळे नाही.