सोन्याचा कटोरा दिला तरी भीकच मागणार! 40 लाखांच्या BMW वालीने कुंड्या चोरल्या

सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये एक बाई BMW कारमधून येऊन चोरी करताना दिसत आहे. या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Oct 28, 2024, 10:49 AM IST
सोन्याचा कटोरा दिला तरी भीकच मागणार! 40 लाखांच्या BMW वालीने कुंड्या चोरल्या  title=

सोशल मीडियावर काही चित्रविचित्र घटना समोर येत असतात. आता एक व्हिडीओ समोर आलायव ज्यामध्ये एक महिला BMW मधून बाहेर येते आणि चक्क झाडांच्या कुंड्या पळवताना दिसते. हा व्हिडीओ पाहतना तुमची झोपच उडून जाईल. तर झालं असं की,  नोएडातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये बीएमडब्ल्यू चालवणारी महिला झाडांच्या कुंड्या चोरताना दिसत आहे. विशेष म्हणजे ज्या BMW मधून ही चोरी करण्यात आली त्याची किंमत सुमारे 40 लाख रुपये आहे. आता सोशल मीडियावर या महिलेची 

काय आहे प्रकरण?

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ नोएडाच्या श्रीमंत परिसर असलेल्या सेक्टर-18 येथील असल्याचे सांगितले जात आहे. जे सेक्टर-20 पोलिस स्टेशनच्या हद्दीत येते. व्हायरल झालेल्या व्हिडिओची ही घटना 20 ऑक्टोबर रोजी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ 2.51 मिनिटांचा आहे, जो खूप वेगाने व्हायरल होत आहे.

महिलेने चोरल्या कुंड्या 

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ती महिला बीएमडब्ल्यूमधून अगदी आरामात खाली उतरत असल्याचे दिसत आहे. यानंतर ती झाडांच्या कुंड्याच्या दुकानाकडे निघाली. सर्वात पहिला तिने आजूबाजूचा आढावा घेतला आणि नंतर ती कुंड्यांच्या वजनाचा अंदाज घेताना व्हिडीओमध्ये दिसत आहे.  मग ती कुंडी उचलते आणि थेट गाडीकडे घेऊन जाते. दरम्यान, कारमधील तिचा दुसरा साथीदार दरवाजा उघडतो आणि महिलेने कुंड्याकारमध्ये ठेवल्या.

लोकांना दिलं उलट उत्तर 

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जेव्हा हा प्रसंग घडला तेव्हा तिच्या या कृतीवर अनेकांनी आक्षेप घेतला. प्रत्यक्ष कुंड्या चोरताना पाहिल्यावर लोकांनी तिला विचारणा देखील केली. यावेळी महिलेने लोकांना उद्धटपणे उत्तर दिली. ती म्हणाली की, मी रोज एक भांड नेईन तुम्हाला काय करायचंय?

अशा कमेंट युजर्सनी केल्या

महिलेने आतापर्यंत दोन फुलांच्या कुंड्या चोरल्याचा दावा केला जात आहे. त्याचवेळी नोएडा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. वाहन क्रमांकावरून आरोपी महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर सोशल मीडिया यूजर्स या घटनेवर नाराजी व्यक्त करत आहेत.

एका युजरने लिहिले की, 'महिला फुलं आणि झाडांसाठी वेड्या असतात, पण त्यांची ही कृती अत्यंत लज्जास्पद आहे. जर कोणी माझ्या झाडांसोबत हे केलं तर मी त्यांच्याशी भांडेन. दुसऱ्या युझरने म्हटलं की, या महिलेचं लग्न एका श्रीमंत व्यक्तीशी झालंय पण तिची मेंटॅलिटी अजूनही झाडं चोरण्यासारखीच आहे.