Trending News Today: मुजफ्फरपुर येथे एक चक्रावणारी घटना घडली आहे. महिलेने तिच्या पतीविरोधात एफआयआर दाखल केली आहे. महिलेची तक्रार ऐकून पोलिसांनाही आश्चर्य व्यक्त केले आहे. पोलिसांनी महिलेची तक्रार नोंदवून घेत तिच्या पतीसह सहा जणांविरोधात तक्रार दाखल करुन घेतली आहे. या प्रकरणी पोलिस आता तपास करत आहे. पीडित महिला लालगंज ठाणे क्षेत्रातील रहिवाशी आहे. तिने दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नाला दोन वर्ष होऊनही तिच्या पतीने तिच्यासोबत शारिरीक संबंध ठेवले नाहीत. तसंच, शिवीगाळ केला.
महिलेने पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, माझे लग्न 31 मे 2021 रोजी झाले होते. लग्नानंतर मी माझ्या सासरी गेले. मात्र, आता लग्नाला दोन वर्ष होत आले तरी माझ्या पतीने माझ्यासोबत शारिरीक संबंध ठेवले नाहीत. ही गोष्ट जेव्हा मी माझ्या सासरच्या लोकांना सांगितली तेव्हा त्यांनीदेखील माझ्या पतीला समजावून सांगितले नाही. सगळेच शांत बसले.
पीडिताने पुढे आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, मी माझ्या पतीसोबत बोलण्याचा प्रयत्न केला. नेमकी काय समस्या आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मी जेव्हा हा विषय काढायचे तेव्हा तो शिवागाळ करायचा व माराहाण करायचा. मी अनेकदा माहेरी जायचीही धमकी दिली. पण त्यावरही त्याने मला धमकावले. घराच्या बाहेर पाऊल जरी टाकले तरी तुझ्या संपूर्ण कुटुंबाला जीवे ठार करेन, अशी धमकी दिली.
पीडिताने पुढे तिच्या आजोबांची तब्येत बिघडली असल्याचा बहाणा बनवून सासरहून माहेरी निघून आली. आताही पती व सासरची लोक सतत धमकी देत आहेत, असं पीडित महिलेने तिच्या तक्रारीत नमूद केले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
महिला पोलीस अधिकारी आदिती कुमार यांनी म्हटलं आहे की, या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आली असून यापुढील कारवाई करण्यात येत आहे. पीडीत महिलेच्या जबाबानुसार, महिलेच्या लग्नानंतर पतीने कधीच तिच्यासोबत शारिरीक संबंध ठेवले नाहीत. कित्येतदा समजावूनही त्याच्यात काहीच बदल झाला नाही. त्यामुळं शेवटी महिलेने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली आहे. पतीसोबतच सासरच्या सहा जणांवरही गुन्हा दाखल केला आहे. पतीला समजवण्याच्या ऐवजी पीडितेवरच दबाव टाकत होते, या प्रकरणी त्यांच्यावरही कारवाई केली आहे.
पोलिसांनी महिलेच्या तक्रारीच्या आधारे आयपीसी कलम 341,323,498 A,379,504,506,34 अंतर्गंत एफआयआर दाखल करुन तपास सुरू केला आहे.