राजस्थानात भाजपला जनतेने नाकारले : राहुल गांधी

राजस्थान विजयानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या शिलेदारांचे कौतुक केले. राहुल गांधी यांनी राजस्थानमधील विजयाबद्दल कौतुक करताना राजस्थानमधील नागरिकांनी भाजपला नाकारल्याचे म्हटले आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 1, 2018, 05:43 PM IST
राजस्थानात भाजपला जनतेने नाकारले : राहुल गांधी title=

नवी दिल्ली : राजस्थान विजयानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या शिलेदारांचे कौतुक केले. राहुल गांधी यांनी राजस्थानमधील विजयाबद्दल कौतुक करताना राजस्थानमधील नागरिकांनी भाजपला नाकारल्याचे म्हटले आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत २५ पैकी २५ जागा मिळवून निर्विवाद वर्चस्व मिळवले होते. तसेच विधानसभेत भाजपचीच सत्ता आहे. असे असताना काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत पोटनिवडणुकीत दोन लोकसभा आणि एका विधानसभेच्या जागेवर दणदणीत विजय मिळवलाय. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपला जोरदार हादरा बसलाय.

सचिन पायलट

दरम्यान, राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांनी भाजपच्या अहंकाराविरोधात मिळविलेला हा विजय असल्याचे म्हटले आहे. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष अशोक परनानी यांनी  २०१९ मध्ये विजय मिळविण्यासाठी कठोर प्रयत्न करावा लागणार असल्याची प्रतिक्रिया दिलेय. त्यामुळे काँग्रेसला अच्छे दिन तर भाजपला बुरे दिन आल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.