दिल्लीत साचलं पाणी तर आज मुंबईला आठवली 26 जुलैची 'तुंबई'

दिल्लीत अनेक भागांमध्ये पाणी साचलं 

Updated: Jul 26, 2018, 02:11 PM IST
दिल्लीत साचलं पाणी तर आज मुंबईला आठवली 26 जुलैची 'तुंबई' title=

नवी दिल्ली : दिल्लीच्या एनसीआर भागात सकाळपासून मुसळधार पाऊस पडतो आहे. दिल्लीत अनेक भागांमध्ये पावसामुळे पाणी साचलं आहे. नोएडा, गाजियाबाद, गुरुग्राममध्ये पावसाची संततधार आहे. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी होते आहे. त्यामुळे कामावर निघालेल्या जनतेला त्रास सहन करावा लागतो आहे.

दुसरीकडे २६ जुलै २००५ मुंबईकरांना लक्षात राहणार एक महत्त्वाचा दिवस आहे. मुंबईसह उपनगरात आलेल्या महापुराला आज १३ वर्ष पूर्ण झाली. दिल्लीत आज पाणी साचल्याने मुंबईकरांना याची आठवण नक्कीच झाली असेल. पण महापुरानंतरही परिस्थिती बदलायला हवी होती. मुंबईतल्या नद्यांचं खोलीकरण, रुंदीकरण केलं. पण म्हणावी तशी परिस्थती बदलली नाही, ही शोकांतिका आहे.

आताही पाऊस म्हटलं की मुंबईकरांच्या काळजा ठोका चुकतोच. पण पालिका प्रशासन आणि राज्य सरकारच्या हृदयाला पाझर फुटणार का ? तर दूर दुरपर्यंत तसं चित्र दिसत नाही. त्यामुळं आता मुंबईकरांनीच परिस्थिती सुधारायला हवी.