नवी दिल्ली : राष्ट्रपती निवडीसाठी आज मतदान होणार आहे. एनडीएकडून रामनाथ कोविंद आणि युपीएकडून मीरा कुमारी यांच्यात राष्ट्रपतीपदासाठी सामना होणार आहे. राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल 20 जुलैला आहे.
देशभरातील एकुण ४ हजार ८५१ खासदार आणि आमदार या निवडणुकीसाठी मतदान करणार आहेत. मात्र एनडीएचं संख्याबळ पाहता रामनाथ कोविंद यांचं पारडं जड आहे. कोविंद यांच्या पक्षात 61 टक्के मतदान होण्याची शक्यता आहे. निवडणुकीसाठी खासदारांना हिरवा रंग तसेच आमदारांना गुलाबी रंगाचा बॅलेट पेपर देण्यात येणार आहे.
पेपरमध्ये मीरा कुमार यांचं नाव पहिल्या क्रमांकावर असेल तर रामनाथ कोविंद यांचं नाव दुस-या क्रमाकांवर असेल. आज संसदेतील खोली क्रमांक ६२ मध्ये मतदान होणार आहे. सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत मतदान होईत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोनिया गांधी, राहुल गांधी, यांच्या सह सरकार मधील सर्व मंत्री आणि खासदार मतदान करणार आहेत. गुजरातचे सर्व आमदार संसदेत मतदान करणार आहेत. यावेळी राष्ट्रपती निवडणूकीसंदर्भात नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्यात कॅमेरा घेऊन प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.