Viral Video: सोशल मीडिया (Social Media) म्हटलं तर तिथे नेहमी एक ट्रेंड (Trend) निर्माण होत असतो. मग या ट्रेंडवर आधारित रिल्स (Reels) तयार करत आपले फॉलोअर्स वाढवण्याचा तसंच इतरांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला जातो. तर दुसऱ्या बाजूला काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ अपघाताचे, स्टंटचे किंवा मग प्रबोधन करणारे असतात. एखादा व्हिडीओ कधी कोणत्या कारणाने व्हायरल होईल सांगता येत नाही. आज प्रत्येकाच्या हातात मोबाइल असल्याने त्यात टिपलेला एखादा क्षणही असाच अचानक व्हायरल होता. सोशल मीडियावर सध्या अशाच एका व्हिडीओची चर्चा आहे, ज्यामध्ये चिमुरडा आई-बापासह वादळाशी लढा देत आहे.
व्हिडीओत चिमुरडा वादळात आपल्या आईला मदत करताना दिसत आहे. सोसाट्याचा वारा सुटलेला असताना दुकानावर असणारी ताडपत्री उडून जाऊ नये यासाठी चिमुरडा ती हाताने पकडून उभा असतो. यावेळी त्याची आई मागे आवराआवर करत असल्याचं दित आहे. त्याची आई रशीने सर्व सामान बांधत असते. याचवेळी प्लास्टिकची खुर्ची उडून गेल्याचं त्याला दिसतं. नंतर चिमुरडा त्या वादळात धावत जातो आणि खुर्ची घेून पुन्हा आईजवळ येतो.
यावेळी इतर लोक आपला बचाव करत पळताना दिसत आहे. तसंच काही लोक एका आडोशाला उभे असल्याचं दिसत आहे. पण चिमुरडा मात्र आईला वादळाची चिंता न करता आईची मदत करताना दिसत आहे.
जिम्मेदारी समझने के लिए उम्र कि जरूरत नहीं, हालात ही सीखा देता हैं! pic.twitter.com/VdGu5saDS8
— Temjen Imna Along (@AlongImna) May 18, 2023
हा व्हिडीओ पाहून अनेकजण भावूक झाले आहेत. इतक्या छोट्या वयात त्याला आपल्यावरील जबाबदारींची जाणीव झाली असल्याची कमेंट काहीजण करत आहे.
सोशल मीडियावर अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केला असून त्यामध्ये नागालँडचे पर्यटन आणि उच्च शिक्षण मंत्री तेमजेन इमना अलांग (Temjen Imna Along) यांचाही समावेश आहे. तेमजेन इमना अलांग हे नेटकऱ्यांचे आवडते राजकीय नेते असून ते सोशल मीडियावर सक्रीय असतात. ते नेहमी वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असतात. त्यांनी चिमुरड्याचा हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर अनेकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत.
तेमजेन इमना अलांग यांनी ट्विटरला व्हिडीओ शेअर करताना म्हटलं आहे की, "जबाबदारी समजण्यासाठी वयाचं बंधन नसतं. परिस्थिती तुम्हाला शिकवते". 31 सेकंदाच्या या व्हिडीओला 2 लाखांपेक्षा अधिक लोकांनी पाहिलं असून 10 हजाराहून अधिक लाईक्स आहेत.
एका युजरने कमेंट करताना म्हटलं आहे की "ज्याक्षणी तुम्हाला जगण्यासाठी काय महत्त्वाचं आहे याची जाणीव होते, तेव्हाच तुम्ही जबाबदार होता, तेव्हा वय महत्त्वाचं राहत नाही". तर एका युजरने हे फार वेदनादायक, ह्रदयस्पर्शी आणि दु:खद असल्याचं म्हटलं आहे.
"संकट आणि सर्वात वाईट काळ तुम्हाला काळजी घेणं आणि जबाबदार राहायला शिकवतो," अशी कमेंट एकाने केली आहे. तर एकाने मोठे लोकही अशा जबाबादरीने वागले असते तर असं म्हटलं आहे. आयुष्य तुम्हाला व्यावहारिक शिक्षण देतं, जे तुम्हाला शाळेत मिळत नाहीत असं एकाने म्हटलं आहे.