UPSC Trending Video : रविवारी देशभरात केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) सिव्हिल सर्व्हिस प्रिलिम्स परीक्षा घेण्यात आली. देशभरातील परिक्षा केंद्रात लाखो विद्यार्थी परिक्षा देण्यासाठी पोहोचले होते. मात्र या परिक्षेला वेळे पोहोचले नाही अशा अनेक विद्यार्थ्यांना आता पुढल्या वर्षाची वाट पाहावी लागणार आहे. औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर विद्यार्थ्यांना गुगल मॅपमुळे परीक्षेला मुकावे लागले. परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांनी गूगल मॅपची मदत घेतली होती. पण या मॅपमुळे त्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचलण्यास विलंब झाला. अशीच एक घटना गुरुग्राममध्ये घडली आहे.
सोशल मीडियावर गुरुग्राममधील एक विद्यार्थींचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये लेकीला परीक्षा केंद्रावर पोहोचायला उशिर झाला. त्यामुळे लेकीला परीक्षेला बसता आलं नाही. लेकीच एक वर्ष वाया गेल्यामुळे आई वडिलांची वेदना असह्य झाली. आई परीक्षा केंद्राच्या गेटवरच बेशुद्ध पडली तर वडिलांना अश्रू अनावर झाले.
या व्हिडीओमध्ये विद्यार्थीनीची आई गेटवरच बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर कोसळली आहे. तर वडील आईला सांभाळत त्यांना अश्रू अनावर झाले आहे. विद्यार्थीनी परिक्षा केंद्राच्या गेटवरील हा प्रकार पाहून बघ्यांनी गर्दी केलीय. पण धक्कादायक म्हणजे कोणीही त्यांना मदत करण्यासाठी जात नाही आहे.
Heartbreaking video.
Condition of Parents who came along with their daughter for the UPSC Prelims exam today, as their daughter was not allowed for being late. Exam starts at 9: 30 am, and they were at the gate at 9 am but were not allowed in by the principal of S.D. Adarsh… pic.twitter.com/2yZuZlSqMZ— Sakshi (@333maheshwariii) June 16, 2024
आपल्या मुलीच एक वर्ष वाया गेले म्हणून त्यांना सहन होत नाही आहे. तर मुलगी आई वडिलांना धीर देताना दिसत आहे. ती म्हणतेय की, 'पप्पा-पानी पिओ! ऐसा क्या कर रहे हो, हम अगली बार एक्झाम देंगें,' मुलीची एक वर्षाची मेहनत वाया गेल्याचे दु:ख वडिलांना आणि आईला सहत होत नाही. रागाच्या भरात असलेले वडील अधिकाऱ्यांना खरीखोटी सुनावताना या व्हिडीओमध्ये पाहिला मिळत आहे.