डॉली चायवाल्यानंतर आता मॉडेल चायवालीची सोशल मीडियावर क्रेझ, चहा पिण्यासाठी लागते रांग... Video

Model Chai Wali : डॉली चायवाल्यानंतर आता सोशल मीडियावर मॉडल चाय वालीची प्रचंड क्रेझ पाहायला मिळतेय. मॉडेल चायवालीचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून या व्हिडिओला आतापर्यंत 11 मिलिअन व्ह्यूज मिळाले आहेत. 

राजीव कासले | Updated: Oct 7, 2024, 02:54 PM IST
डॉली चायवाल्यानंतर आता मॉडेल चायवालीची सोशल मीडियावर क्रेझ, चहा पिण्यासाठी लागते रांग... Video title=

Model Chai Wali : मायक्रोसॉफ्ट को-फाऊंडर बिल गेट्स नागपूरच्या डॉली चायवाल्याला भेटले आणि डॉली चायवाला (Dolly Chaiwala) रातोरात स्टार झाला. आता डॉली चायवाला सेलिब्रेटी झाला असून वेगवेगळ्या देशात त्याला कार्यक्रमांना बोलावलं जातं. एका कार्यक्रमाचे तो लाखो रुपये घेतो. डॉली चायवाल्याप्रमाणेच आता सोशल मीडियावर मॉडेल चाय वालीचा (Model Chai Wali_ क्रेझ पाहायल मिळतेय. मॉडेल चायवालीचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून या व्हिडिओला आतापर्यंत 11 मिलिअन व्ह्यूज मिळाले आहेत. 

कोण आहे मॉडेल चायवाली?
फूड ब्लॉगिंग चॅनल 'द हंग्री पंजाबी' वरुन इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात ब्यूटी कॉम्पिटिशन विजेती सिमरन गुप्ता एका चहा स्टॉलवर चहा बनवताना दिसत आहे. सिमरन गुप्ताने चहाच्या व्यवसायात आपली कारकिर्द करण्याचा निर्णय घेतला आहे. नोकरीच्या जाळ्यात न अकडता सिमरनने हटके व्यवसाय निवडला असून सोशल मीडियावर सध्या सिमरनची चर्चा रंगली आहे. तिच्या स्टॉलवर चहा पिण्यासाठी लोकांची अक्षरश: रांग लागते.

सिमरन गुप्ताने 2018 मध्ये मिस गोरखपूरचा खिताब जिंकला. त्यानंतर मॉडलिंग क्षेत्रात तीने कारकिर्द करण्याचा निर्णय घेतला. यासाठी तीने दिल्ली गाठलं. मॉडलिंगसाठी तिला वेगवेगळ्या कंपन्यांकडून प्रस्ताव येऊ लागले. सिमरनने काही जाहीरातींमध्येही काम केलं. तिच्या मॉडलिंग कारकिर्दीने चांगला वेग पकडला होता. पण यादरम्यान कोविड महामारीने थैमान घालायला सुरुवात केली आणि सिमरनची सर्व कामं बंद झाली. लॉकडाऊनमुळे तर सिमरनवर बेरोजागारीची कुऱ्हाड कोसळली. सिमरन दिल्लीहून पुन्हा आपल्या गावी गोरखपूरला परतली.

सिमरनने सुरु केला चहाचा व्यवसाय
सिमरन ही कुटुंबातील एकमेक कमावती होती. सिमरनच्या बेरोजगारीची झळ तिच्या कुटुंबियांनाही बसली. यातून सावरण्यासाठी सिमरनने लखनऊमध्ये चहाचा स्टॉल सुरु करण्याचा निर्णय घेतला. यासाठी तिला एमबीए चायवाला प्रफुल्ल बिल्लोर आणि पटना ग्रॅज्यूएट चहा विक्रेता प्रियंका गुप्ताकडून प्रेरणा मिळाली. सिमरनन चहाचा स्टॉल सुरु केल्यानंतर सुरुवातीला तिला अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. पण आता तीने या व्यवसायात जम बसवला आहे. महिन्याला लाखो रुपयांची कमाई ती चहा विक्रीतून करते. 

सोशल मीडियावर सिमरनचा चहा विकतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ती प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. अवघ्या पाच दिवसात तिच्या व्हिडिओला पाच लाखाहून जास्त लाईक आणि मिलिअन व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या असून युजर्सने तिच्या कामाचं कौतुक केलं आहे. तर काहींनी तिला पाठिंबा दर्शवला आहे.