Uttar Pradesh Agra: उत्तर प्रदेशमधील आग्रा येथील ताजमहल पाहण्यासाठी आलेल्या एका वयस्कर पर्यटकाला हृदयविकाराचा झटका आला. या व्यक्तीला त्याच्या मुलाने सीपीआर देऊन म्हणजेच कार्डिओ-पल्मोनरी रिससिटेशनच्या मदतीने वाचवलं. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आपल्या कुटुंबियांबरोबर ताजमहाल पाहण्यासाठी आलेल्या या वयस्कर व्यक्तीची प्रकृती अचानक बघडली. व्हिडीओमध्ये जमीनीवर पडलेल्या या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करताना एक व्यक्ती दिसत आहे. अखेर या व्यक्तीला यश येत आणि त्याचे वडील वाचतात.
हा मुलगा त्याच्या वडिलांना वाचवण्याचा प्रयत्न करत होता. त्याने तोंडाने आपल्या वडिलांना श्वास दिला. तसेच छाती दाबून हृदयाचे ठोके पुन्हा सुरु करण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ ही व्यक्ती वडिलांना वाचवण्याचा प्रयत्न करत होता. या मुलाला अखेर यश आलं आणि ही व्यक्ती शुद्दीवर आली. तिला तातडीने जवळच्या रुग्णालयामध्ये नेण्यात आलं, असं एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे.
हा संपूर्ण प्रकार घडला त्यावेळी या ठिकाणी उभ्या असलेल्या पर्यटकांपैकी एकाने मोबाईलमध्ये शूट केलेला संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आप्तकालीन परिस्थितीमध्ये बेसिक प्रथमोपचारांसंदर्भातील माहिती असणं का महत्त्वाचं आहे हे या घटनेमधून अधोरेखित झालं आहे. सोशल मीडियावर वेगवेगळ्या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ व्हायरल झाल्याचं दिसत आहे.
उत्तर प्रदेश के आगरा में बुधवार की दोपहर 12:45 बजे ताजमहल घूमने आए 76 साल के बुजुर्ग को हार्ट अटैक आया. इसके बाद उनके बेटे ने CPR देकर उनकी जान बचाई.#tajmahalagra pic.twitter.com/L9lyHJTdbx
— Sumit Kumar (@SumitKu97606402) November 16, 2023
मध्य प्रदेशमधील एका पोलीस अधिकाऱ्याने सीपीआरच्या मदतीने एका सापाचा जीव वाचवला होता. मध्य प्रदेशमधील नर्मदापुरममध्ये ही घटना घडली होती. व्हायरल व्हिडीओमध्ये पोलीस कर्मचारी सापाच्या तोंडात हवा फुंकताना दिसत आहे. या सापाचा जीव पोलीस अधिकाऱ्यामुळे वाचला होता.
आप्तकालीन परिस्थितीमध्ये एखाद्या व्यक्तीला श्वास घेताना त्रास होत असेल किंवा त्याच्या हृदयाचे ठोके थांबले तर तात्काळ त्याला त्याला सीपीआर देऊन जीव वाचवता येतो. जोपर्यंत वैदयकीय उपचार पोहचत नाही तोपर्यंत सीपीआरच्या माध्यमातून रक्ताभिसरण सुरु ठेवण्यास मदत होते आणि शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा होत राहतो. हल्ली अनेक कंपन्यांमध्ये यासंदर्भातील जागृती केली जाते.