बाराबंकी : Truck and Passenger Bus Road Accident : उत्तर प्रदेशतील बाराबंकीमध्ये गुरुवारी सकाळी ट्रक आणि प्रवासी बसची जोरदार धडक झाली. (Truck and Passenger Bus Collision in Barabanki) या अपघातात सुमारे 11 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. 27 जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जखमी प्रवाशांची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. त्यांना अधिक चांगल्या उपचारासाठी लखनऊला हलविण्यात येण्याची शक्यता आहे. सांगितले जात आहे की, ही डबल डेकर बस दिल्लीहून बहराइचकडे जात होती. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे आणि सर्व शक्य मदतीचा विश्वास व्यक्त केला आहे.
डबल डेकर बस आणि ट्रकमध्ये धडक झाल्यानंतर ट्रकचा चेंदामेंदा झाला. अपघातग्रस्त गाड्यांची अवस्था पाहिल्यानंतर हा अपघात किती भयंकर होता याची कल्पना लक्षात येते. वाळूने भरलेल्या हा ट्रक चुकीच्या दिशने भरधाव वेगाने जात होते. यावेळी समोरून येणाऱ्या व्होल्वो बसला जोरदार धडक दिली. डबलडेकर बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या अपघातामुळे मोठा झटका बसला. या अपघातानंतर वाहनचालकाने घटनास्थळावरून पळ काढला, अशी माहिती देण्यात आली आहे.
9 people killed, 27 injured in collision between a truck and a passenger bus in Barabanki. The injured have been shifted to Trauma Centre, says DM Barabanki. pic.twitter.com/WqaMlPyBEv
— ANI UP (@ANINewsUP) October 7, 2021
हा अपघात बाराबंकी जिल्ह्यातील आऊटर रिंग रोडवरील पोलीस स्टेशन परिसरातील बाबुरिया गावात घडला. पोलिसांनी सांगितले की, अपघातात अनेक लोक जखमी झाले आहेत. ज्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अपघाताबद्दल शोक व्यक्त केले आहे. मृतांच्या कुटुंबीयांप्रती तीव्र संवेदना व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री योगी यांनी सर्व शक्य मदतीचे आश्वासन दिले आहे.2 दिवसांपूर्वी बस उलटून 19 लोक जखमी झाले होते
तत्पूर्वी मंगळवारी रात्री गोरखपूरहून लुधियानाकडे जाणारी डबल डेकर बस ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात अयोध्या महामार्गाजवळ उलटली. अपघातात सुमारे 19 प्रवासी जखमी झाले, ज्यांना किरकोळ दुखापत झाली आणि त्यांना प्राथमिक उपचारानंतर घरी पाठवण्यात आले. सांगितले जात आहे की बसमध्ये ओव्हरलोडिंग करण्यात आले होते आणि 56 आसनी बसमध्ये सुमारे 76 प्रवासी होते.