मुंबई : कोणीही वाहतुकीचे नियम तोडले, तर ट्राफिक पोलिस त्या व्यक्तीला चलान लावतो. त्यात आता ऑनलाईन चलान प्रक्रिया असल्यामुळे फक्त फोटो काढून आपल्या गाडीवरती चलान लावलं जातं. ज्याची माहिती बऱ्याच लोकांना नसते. ज्यामुळे लोकांवरती चलानवर चलान वाढत चालले आहे. परंतु एकदा जर पोलिसांनी तुमची गाडी पकडली आणि त्याच्यावरती त्यांना जास्त चलान लागलेला दिसला तर तुम्हाला पोलिसांकडून तुमची गाडी सोडवणे कठीण होऊन बसेल.
त्यामुळे तुमच्या गाडीवर देखील असा कोणता चलान असेल, तर तो भरा, आता यासाठी ट्राफिक पोलिसांकडून लोकांना यासाठी डिस्काउंट देखील मिळत आहे.
हैदराबाद, सायबराबाद आणि राचकोंडा येथील वाहतूक पोलिसांनी ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेचा नोंदणी क्रमांक असलेल्या वाहनांसाठी वाहतूक चलनात सवलत जाहीर केली आहे. 600 कोटी रुपयांची थकबाकी असलेल्या चलनाची माहिती घेऊन ही नवीन घोषणा करण्यात आली आहे.
हैदराबाद ट्रॅफिक पोलिसांनी जारी केलेल्या माहितीनुसार, हा निर्णय मानवतेच्या आधारावर घेण्यात आला आहे, कारण कोविड-19 दरम्यान लोकांना आर्थिक अडचणींमुळे हे चलान भरणे शक्य होत नाहीय, ज्यामुळे त्यांना या चलनात सुट देण्याचा निर्णय येथील महानगर पालिकेने केला आहे.
या सवलतीत दुचाकी चालकांना एकूण चलनाच्या केवळ २५ टक्केच रक्कम भरावी लागणार आहे, तर हलकी मोटार, कार, एसयूव्ही आणि अवजड वाहन चालकांना एकूण चलनाच्या 50 टक्के रक्कम भरावी लागणार आहे. आरटीसी अर्थात रस्ते परिवहन महामंडळाच्या बस चालकांना थकीत चालानच्या 30 टक्के रक्कम भरावी लागणार आहे.
तेलंगणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या सवलतीचा लाभ घेण्यासाठी सर्व चालकांना ऑनलाइन पेमेंटचा पर्याय देण्यात आला आहे.