Stock Market मध्ये 28 तारखेपासून लिस्टेट होतील हे दोन शेअर्स, नुकतेच आले होते IPO

कृष्णा इंन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायंन्स (KIMS IPO) आणि डोडला डेअरीचे शेअर्स सोमवारी स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेट होतील

Updated: Jun 27, 2021, 02:54 PM IST
Stock Market मध्ये 28 तारखेपासून लिस्टेट होतील हे दोन शेअर्स, नुकतेच आले होते IPO

मुंबई : कृष्णा इंन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायंन्स (KIMS IPO) आणि डोडला डेअरीचे शेअर्स सोमवारी स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेट होतील. नुकतेच या दोन्ही कंपन्यांचे IPO आले  होते. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार शेअर एक्स्चेंजने ही माहिती दिली आहे.

दोन्ही IPO ला चांगला प्रतिसाद
KIMS ने IPO च्या माध्यमातून 2 हजार 144 कोटी रुपये उभारले होते. यातील 955 कोटींची रक्कम गुंतवणूकदारांनी जमवली केली होती. तसेच डोडला डेअरीच्या IPO तून 520 कोटी रुपये उभारले होते.  डोडला डेअरीच्या 520 कोटींच्या शेअर्सला 45 पट अधिक सब्सक्रिप्शन मिळाले होते. 

KIMS च्या आयपीयो बाबत तज्ज्ञांनी सल्ला दिला आहे की, यामध्ये त्या गुंतवणूकदारांनी पैसे लावावे ज्यांच्यात जोखीम घेण्याची क्षमता आहे. परंतु कंपनीच्या उत्तम मॅनेजमेंटने कंपनीला नफ्यात आणले आहे. त्यामुळे कंपनीबाबत गुंतवणूकदार सकारात्मक आहेत.