नवी दिल्ली : देशभरात दिवाळी साजरी होत असताना परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानी नागरिकांना मोठं गिफ्ट दिलंय.
सुषमा स्वराज यांनी ट्विट करत सांगितले की, ‘दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर भारताकडून त्या सर्वांनाच मेडिकल व्हिजा दिला जाईल, ज्यांचे प्रलंबित आहेत’.
On the auspicious occasion of Deepawali, India will grant medical Visa in all deserving cases pending today. @IndiainPakistan
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) October 19, 2017
याआधी पाकिस्तानच्या कराचीतील तरूणी आमना शमीमने ट्विटर सुषमा स्वराज यांच्याकडे मदत मागितली होती. तिने लिहिले होते की, ‘कृपया आम्हाला व्हिजा द्या. माझे वडील आधीपासूनच दिल्लीत आहेत. ते लिव्हरच्या त्रासावर उपचार घेत आहेत. मला त्यांच्या देखभालीसाठी तिकडे यायचे आहे. माझा भाऊ तेथून परत येईल’. यावर स्वराज यांनी तरूणीला पाकिस्तानातील भारतीय उच्चायोगकडे संपर्क करण्याचे सांगितले होते.
Pls contact Indian High Commission in Pakistan. We will allow this. https://t.co/AYYENKtf7E
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) October 19, 2017
याआधी सुषमा स्वराज यांनी ट्विटरवर अनेक पाकिस्तानी नागरिकांना मेडिकल व्हिजा मिळण्यासाठी मदत केली आहे. इतकेच नाही तर परदेशात फसलेल्या भारतीयांनाही तात्काळ त्यांनी मदत केली आहे. त्यामुळेच त्यांचं कौतुक केलं जात आहे.