मुंबई : इंधन दरवाढीची झळ बसत असतानाच आता स्वयंपाकाचा गॅसही महागल्यानं सामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर आणखी महागला असल्यामुळे महिलांच किचन बजेट बिघडणार आहे. अनुदान नसलेल्या गॅसच्या दरात ४८ रुपयांची वाढ तर अनुदान असलेल्या गॅस सिलिंडरच्या दरात अडीच रुपयांनी वाढ झाली आहे.
भाजीपाला महागला आणि आता इंधन महागल्यामुळे सामान्यांच्या बजेटवर मोठा बोझा पडणार आहे. इंधनाचे दर सातत्यानं वाढत आहेत. अशा स्थितीत स्वयंपाकाचा गॅस महागल्यानं महागाईचे चटके सोसणा-या सामान्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.