मुंबई : जगभरातील शेअर बाजारांमध्ये झालेल्या घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजारांवरही दिसून येत आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE)चा निर्देशांक सेंसेक्स आज सलग तिसऱ्या दिवशी घसरला आहे. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक निफ्टीवरदेखील मोठा दबाब दिसून येत आहे.
बाजार सुरू होताच मोठ्या गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावल्याने दोन्ही निर्देशांकात घसरण दिसून आली. बाजारात आयटी इंडेक्समध्ये आज मोठी घसरण नोंदवली गेली. त्यासोबत फार्मा, ऑटो आणि फायनान्शिएल इंडेक्सदेखील दबावात व्यवहार करीत आहेत.
दुपारी 2 वाजेपर्यंत सेंसेक्स तब्बल 800 अंकांहून अधिक तर निफ्टी 220 अंकानी घसरले होते. काल (19 जानेवारी) रोजी देखील सेसेंक्स 500 हून अधिक अंकांनी घसरला होता.
सध्या सेसेंक्स 59,236.67 अंकाच्या आसपास व्यवहार करीत आहेत तर निफ्टी 17,716.80 अंकावर व्यवहार करीत आहे.
देशांअंतर्गत बाजारातील सेंटीमेंट ग्लोबल मार्केटमुळे कमकूवत राहिल्याने ही घसरण झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आशियातील इतर बाजारांमध्येही मंदीचे वातावरण आहे.
तसेच बुधवारी अमेरिकेतील Dow Jones मध्येही मोठी घसरण नोंदवली गेली. ग्लोबल मार्केटमधून गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा कायम ठेवल्याने भारतीय बाजारदेखील घसरले आहेत.
लवकरच देशाचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. त्यावेळी सकारात्मक संकेत मिळून बाजार तेजी नोंदवण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या होत असलेली घसरण येणाऱ्या तेजीची नांदी ठरू शकते असेही तज्त्र सांगतात.