नवी दिल्ली : मोदी सरकारविरोधात काँग्रेस आणि पीडीपीने अविश्वास ठराव दाखल केलाय. यावर चर्चा करताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जोरदार हल्लाबोल चढवला. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. माझे म्हणणे हे जनतेचा आवाज आहे. तसेच सत्ताधारी लोकांनाही पटले आहे. फक्त विरोधकच नव्हे, तर सत्ताधाऱ्यांनीही माझ्या भाषणाचं कौतुक केले. केंद्रीय मंत्री हरसिमरत कौरही माझ्याकडे पाहून हसताहेत, असे राहुल गांधी यांनी म्हटले. यावर कौर यांनी स्पष्टीकरण दिलेय.
फक्त विरोधकच नव्हे, तर सत्ताधाऱ्यांनीही माझ्या भाषणाचं कौतुक केले. कारण ज्या भावना माझ्या मनात आहेत, त्याच त्यांच्याही मनात आहेत', अशी टिप्पणी करत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जोरदार चिमटा काढला. दरम्यान, राहुल गांधी यांच्या विधानाचा हरसिमरत यांनी समाचार घेतला आहे. राहुल यांच्याकडे पाहून आपण का हसले, याचा खुलासाही त्यांनी केला.
अविश्वास ठरावाच्या चर्चेदरम्यान, राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यात काही तथ्य नसल्याचा दावा करत भाजप खासदार आक्रमक झाले. त्यामुळे सभागृहाचं कामकाज तहकूब करावं लागले होते. त्यानंतर, कामकाज पुन्हा सुरु झाले. तेव्हा राहुल गांधींनी हरसिमरत कौर यांचा उल्लेख केला. सभागृह तहकूब असताना सत्ताधाऱ्यांनीही माझं अभिनंदन केलं, हरसिमरत कौर माझ्याकडे पाहून हसल्या, असे ते म्हणाले होते. त्याबाबत कौर यांना विचारले असता, पंजाबी नागरिकांना व्यसनाधीन म्हणणारे आज स्वतः काय खाऊन आले आहेत?, असे विचारताना आपल्याला हसू आल्याचे त्यांनी सांगितले.
राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची गळाभेट घेणं हे निव्वळ नाटक असल्याचा टोलाही हरसिमरत कौर यांनी लगावला.
#WATCH: Union Minister Harsimrat Kaur Badal says,"I asked Rahul Gandhi aaj kaunsa karke aaye hai? Because he had earlier called Punjabis 'nashedis'. #NoConfidenceMotion pic.twitter.com/HiCsCVnCVb
— ANI (@ANI) July 20, 2018