समुद्राच्या मधोमध हनुमानजीप्रमाणे हवेत उडला सैन्याचा जवान, व्हिडीओ पाहून सगळेच थक्क

एका व्यक्तीला पाण्यावरती हनुमानजी सारखा उडताना पाहिलं गेलं आहे. 

Updated: Jan 12, 2022, 06:09 PM IST
समुद्राच्या मधोमध हनुमानजीप्रमाणे हवेत उडला सैन्याचा जवान, व्हिडीओ पाहून सगळेच थक्क title=

मुंबई : रामायणात तुम्ही हनुमानजी कसे हवेत उडतात हे ऐकले आहे. एवढेच काय तर आपण रामायण सिनेमा आणि सीरियल्समध्ये हे पाहिले देखील आहे. ज्यामध्ये नुमानजी समुद्र पार करून लंकेमध्ये सितामातेला शोधायला जातात. तसेच ते संजीवनीच्या शोधात देखील हवेत उडत जातात. संजीवनी पर्वत हनुमानजी आपल्या हातावर उडत घेऊन येतात . परंतु हे सगळं ग्राफिक्सच्या माध्यमातून करता येणं शक्य आहे. परंतु माणूस हा त्यांच्याप्रमाणे उडू शकत नाही हे आपल्या सगळ्यांना माहित आहे.

परंतु सध्या एका व्यक्तीला पाण्यावरती हनुमानजी सारखा उडताना पाहिलं गेलं आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे. या व्यक्तीला असं पाण्यावरती उडताना पाहून सगळ्यांनाच आश्चर्य झाला आहे.

विज्ञानाने एवढी प्रगती केली आहे की आज लोक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आकाशात उडताना दिसतात. विमान, हेलिकॉप्टर आणि पॅराशूटसह हवेत उडताना आपण लोकांना पाहिले आहे, परंतु या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती समुद्रावर हनुमानजीप्रमाणे हवेत इकडून तिकडे जाताना दिसत आहे. ज्यामुळे लोकांना तो व्यक्ती हनुमानजी असल्यासारखे वाटत आहे.

पण हवेत उडणार हनुमानजी नसुन तो व्यक्ती लष्कराचा एक जवान आहे. जो समुद्राच्या मध्यभागी हवेत उडताना दिसत आहे. लष्कराचे एक जहाज समुद्रात चालत असल्याचे व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. त्यामागे एक छोटी बोटही समुद्रात चालत आहे. त्यावेळी अचानक या बोटीतून एक तरुण आकाशात उडू लागतो.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की हा तरुण मोठ्या जहाजाभोवती हवेत घिरट्या घालत आहे. त्यानंतर तो मोठ्या जहाजावर उतरतो. हे दृश्य खूप आश्चर्यकारक आहे. हा व्हिडीओ आयएएस अधिकारी डॉ एम व्ही राव यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. आयएएस अधिकाऱ्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मी हे करू शकलो असतो. कधीकधी मी माझ्या स्वप्नात हे करतो.'

39 सेकंदाचा हा व्हिडीओ 52 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. त्याचबरोबर या व्हिडीओला 3 हजार 200 हून अधिक लोकांनी लाइक केले आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर यूजर्स मजेशीर कमेंट करत आहेत. व्हिडीओ पाहून एका यूजरने लिहिले की, 'उडता जवान पाहून कलियुगात त्रेतायुगाची अनुभूती येत आहे.