Shark Tank 2: 'अशनीर ग्रोवरशिवाय मजा नाही' म्हणणाऱ्या ट्रोलरला अनुपम मित्तलने दिलं उत्तर, म्हणाले "बिग बॉस...."

शार्क टँकच्या दुसऱ्या पर्वात अशनीर ग्रोव्हर नसल्याने पाहण्यात मजा येत नसल्याची तक्रार अनेक प्रेक्षक करत आहेत. अनुपम मित्तल यांनी इन्स्टाग्रामला एक व्हिडीओ शेअर केल्यानंतरही कमेंट सेक्शनमध्ये एका युजरने अशनीर ग्रोवर यांचा उल्लेख करत ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. या ट्रोलरला अनुपम मित्तल यांनी उत्तर दिलं आहे.   

Updated: Jan 25, 2023, 09:13 AM IST
 Shark Tank 2: 'अशनीर ग्रोवरशिवाय मजा नाही' म्हणणाऱ्या ट्रोलरला अनुपम मित्तलने दिलं उत्तर, म्हणाले "बिग बॉस...." title=
Shark Tank 2: अशनीर ग्रोवरचा उल्लेख करत ट्रोल करणाऱ्याला अनुपम मित्तलचं उत्तर

Shark Tank Season 2: शार्क टँकच्या दुसऱ्या पर्वालाही (Shark Tank Season 2) प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. मात्र गेल्या पर्वात सर्वाधिक चर्चेत असलेले अशनीर ग्रोवर (Ashneer Grover) या पर्वात नसल्याने बरीच चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावरही याबद्दल अनेकजण पोस्ट करत असतात. अनुपम मित्तल (Anupam Mittal) यांनी 'शार्क २' मधील एक व्हिडीओ शेअर केल्यानंतरही नेमकं हेच झालं. अनुपम मित्तल यांनी एका बुटाच्या ब्रँड मालकाला नोकरीची ऑफर दिली असून त्याचा व्हिडीओ त्यांनी शेअर केला होता. पण कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी दुसऱ्या पर्वाच्या तुलनेत पहिलं पर्व किती मनोरंजक होतं याबद्दल मत मांडलं आहे. यामध्ये BharatPe चे सह-संस्थापक अशनीर ग्रोवर यांचाही उल्लेख होता. 

व्हिडीओत नेमकं काय?

अनुपम मित्तल यांनी शार्क टँकच्या दुसऱ्या पर्वातील एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये गणेश बाळकृष्णन आपल्या बुटाच्या ब्रँडसाठी पोहोचले होते. गणेश यांनी शार्कला हा व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर असून गुंतवणूकदारही गुंतवणूक करण्यास तयार नाहीत असं सांगितलं तेव्हा सगळेच भावूक झाले. जेव्हा अनुपम यांनी त्यांना वैयक्तिक आयुष्याबद्दल विचारले, तेव्हा त्यांनी सांगितलं की पत्नीच्या कमाईवर घर चालतं. तसंच त्यांना १० वर्षांची मुलगीही आहे.

गणेश यांनी यावेळी आता आपण नोकरी शोधण्याचा विचार करत असल्याचं सांगितलं. यानंतर अनुपम यांनी त्यांना नोकरीची ऑफर दिली. व्यावसायातील काही महत्त्वाच्या गोष्टी शिकल्यानंतर आपण त्यात गुंतवणूक करु असं आश्वासनही त्यांनी दिलं. "हा मंच त्यासाठी नाही, पण जर तुम्हाला गरज असेल तर मी तुम्हाला नोकरी देण्यास तयार आहे. तुम्ही तयार असाल तेव्हा तुमच्या D2C ब्रँडमध्ये गुंतवणूक करेन," असं आश्वासन त्यांनी दिलं. 

कमेंटमध्ये अशनीर ग्रोव्हर यांचा उल्लेख

कमेंट सेक्शनमध्ये एका युजरने म्हटलं आहे की, "अशनीर ग्रोवर नसल्याने काही मजा येत नाही आहे". त्यावर अनुपम यांनी 'बिग बॉस पाहून घ्या' असं उत्तर दिलं आहे. 

Shark Tank, Big Boss, Shark Tank Season 2, Anupam Mittal,

दरम्यान दुसऱ्या एका नेटिझनने म्हटलं आहे की "सर, शार्क टँकच्या दुसऱ्या पर्वात मजा येत नाही. सर्व काही बनावट वाटत आहे. पहिलं पर्व एकदम नैसर्गिक वाटत होतं. दुसऱ्या पर्वाचा इंडियन आयडल करु नका. सर्व शार्कसाठी माझा हा एक सल्ला आहे".

यावर अनुपम यांनी प्रयत्न सुरु आहेत असं उत्तर दिलं आहे. 

दुसऱ्या पर्वातील शार्क कोण आहेत?

कॉमेडियन राहुल दुआ दुसऱ्या पर्वाचं सूत्रसंचालन करत आहे. तसंच एकूण सहा शार्क आहेत. 
1) शादी.कॉमचे अनुपम मित्तल (Anupam Mittal Founder-CEO of Shaadi.com)
2) बोटचे सह-संस्थापक, सीएमओ अमन गुप्ता (Aman Gupta Co-Founder-CMO of boAt)
3) नमिता थापर (Namita Thapar Executive Director of Emcure Pharmaceuticals) 
4) शुगर कॉस्मेटिक्सच्या विनिता सिंग (Vineeta Singh Co-Founder-CEO of SUGAR Cosmetics) 
5) लेन्सकार्टचे संस्थापक पियुष बन्सल (Peyush Bansal Founder-CEO of Lenskart.com)
6) अमित जैन (Amit Jain Co-Founder-CEO of CarDekho Group and InsuranceDekho.com)