अमृत फार्मास्युटिकल्सचे संचालक शैलेश जोशींची आत्महत्या

कौटुंबिक कारणामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Updated: Jun 4, 2018, 01:24 PM IST
अमृत फार्मास्युटिकल्सचे संचालक शैलेश जोशींची आत्महत्या title=

बेळगाव: तरुण उद्योजक आणि अमृत फार्मास्युटिकल्स कंपनीचे संचालक शैलेश जोशी यांनी रविवारी मध्यरात्री रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून घेऊन बेळगावमध्ये आत्महत्या केली. ते चाळीस वर्षाचे होते. प्रसिद्ध अशा अमृत मलमची निर्मिती करणाऱ्या अमृत फार्मास्युटिकल्सचा विस्तार त्यांनी देशभर वाढवला होता. अमृत मलममुळे त्यांचे नाव देशभर पोचले होते. अडीअडचणीत असलेल्याना मदत करण्यास ते सदैव तत्पर असत. अनेक सामाजिक संघटनांशी त्यांचे संबंध होते. माजी महापौर शरद जोशी यांचे ते सुपुत्र होते. कौटुंबिक कारणामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.