'तेव्हा बाळासाहेबांमुळे पार पडली अमरनाथ यात्रा'

जम्मू-काश्मीरमध्ये अमरनाथच्या यात्रेकरुंवर दहशतवादी हल्ला करण्यात आला.

Updated: Jul 11, 2017, 04:45 PM IST
'तेव्हा बाळासाहेबांमुळे पार पडली अमरनाथ यात्रा' title=

मुंबई : जम्मू-काश्मीरमध्ये अमरनाथच्या यात्रेकरुंवर दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ७ जणांचा मृत्यू तर १९ जखमी झाले. या मुद्द्यावरून शिवसेनेनं भाजपवर निशाणा साधला आहे. अमरनाथ यात्रेकरुंवरील हल्ला हा देशवासियांवरील हल्ला आहे. दिल्लीतल्या सरकारवर हल्ला आहे. त्यामुळे या हल्ल्याचा निषेध करण्याची ही वेळ नसून चोख प्रत्युत्तर देण्याची वेळ आली आहे अशी भूमिका शिवसेनेनं मांडली आहे.

१९९६साली अमरनाथ यात्रेवरही संकट होतं. त्यावेळी अमरनाथच्या यात्रेकरूंच्या केसालाही धक्का लागला तर मुंबईतूनच नाही तर देशातूनही हज यात्रेसाठीचं एकही विमान जाऊ देणार नाही, असं बाळासाहेब ठाकरेंनी ठणकावल्याची आठवणही संजय राऊत यांनी करून दिली.

सर्जिकल स्ट्राईक, नोटबंदीमुळे काहीच फरक पडला नसून पाकिस्तान आणि दहशतवाद्यांचा चोख बंदोबस्त करायलाच हवा असं राऊत यांनी म्हटलंय.