Rule Change From 1st January : 2025 या वर्षात काय करायचं याचे नियोजन अनेक जण करत असतात. 2025 वर्षासाठी आर्थिक नियोजन करणाऱ्यांचे गणित बिघडवणारी अपडेट समोर आली आहे. 1 जानेवारी 2025 पाच नियम बदलणार आहेत. यात LPG ते UPI यांचा समावेश आहे. या बदलांचा परिणाम गरिबांपासून श्रीमंतावर होणार आहे.
1 जानेवारी 2025 पासून देशात अनेक मोठे बदल लागू होणार आहेत. याचा प्रभाव थेट घरावर होणार असून याचा फटका प्रत्येक खिशासा बसणार आहे. नविन वर्षात बदलणाऱ्या या नियमांमध्ये स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या एलपीजी सिलिंडरच्या किंमतीपासून ते UPI पेमेंटपर्यंतच्या नियमांचा समावेश आहे.
LPG ते UPI नियमात बदल
देशात दर महिन्याला अनेक आर्थिक बदल होत होत असतात. 1 जानेवारीपासून फक्त नवीन महिनाच नाही तर नवीन वर्षही सुरू होत आहे. वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून देशात पाच मोठे बदल लागू होणार आहेत. सर्वप्रथम, एलपीजी सिलेंडरच्या किंमती आणि विमान इंधनाच्या दरात बदल पहायला मिळणार आहे. तेल विपणन कंपन्या महिन्याच्या पहिल्या दिवशी हे बदल करतात. यासह UPI 123Pay पेमेंटचे नियम देखील 1 जानेवारीपासून बदलणार आहेत. तसेच EPFO पेन्शनधारकांसाठी आणलेला नवा नियमही 1 जानेवारीपासून लागू होणार आहे. शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जाबाबतही नियम लागू होणार आहे.
1 जानेवारी 2025 रोजी तेल विपणन कंपन्या आणि व्यावसायिक एलपीजी गॅसच्या किमतीत बदल होतील. यांचे नवीन दर जाहीर होतील. मागील काहीदिवसांपासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत अनेक बदल पहायला मिळाले आहेत. असे असले तरी 14 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती दीर्घकाळापासून स्थिर आहेत. यामुळे घरगुती गॅस सिलेंडरचे दर वाढण्याची शक्यता आहे. यासह हवाई इंधनाच्या किमतीतही बदल पहायला मिळू शकतात.
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 1 जानेवारी 2025 रोजी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFO कडून पेन्शनधारकांसाठी एक नवीन नियम लागू केला जाणार आहे. हा नियम पेन्शनधारकांसाठी मोठी भेट असणार आहे. EPFO आता पेन्शनधारक देशातील कोणत्याही बँकेतून त्यांच्या पेन्शनची रक्कम काढू शकणार आहेत. यासाठी त्यांना कोणत्याही अतिरिक्त पडताळणीची आवश्यकता नाही.
UPI 123Pay चे नियम बदलणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने UPI 123Pay हे फीचर फोनद्वारे ऑनलाइन पेमेंटची सुविधा देण्यासाठी सुरू केले होते. त्याची व्यवहार मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 1 जानेवारीपासून हा बदल लागू होणार आहे. आता फोनद्वारे 10,000 रुपयांपर्यंतचे ऑनलाइन पेमेंट करता येणार आहे. यापूर्वी ही मर्यादा फक्त 5,000 रुपये इतकी होती.
सेन्सेक्स, सेन्सेक्स-50 आणि बँकेक्सवरून मासिक एक्स्पायरीपर्यंत बदलण्यात आले आहेत. आता दर आठवड्याला शुक्रवारी नव्हे तर मंगळवारी होणार आहे. तर तिमाही आणि सहामाही करार शेवटच्या मंगळवारी संपणार आहेत. दुसरीकडे, NSE निर्देशांकाने निफ्टी 50 मासिक करारांसाठी गुरुवार निश्चित करण्यात आला आहे.
1 जानेवारी 2025 पासून पुढील बदल शेतकऱ्यांशी संबंधित आहे. वर्षाच्या पहिल्या दिवसापासून, RBI शेतकऱ्यांना कोणत्याही हमीशिवाय 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देणार आहे. आरबीआयने शेतकऱ्यांसाठी असुरक्षित कर्जाची मर्यादा वाढवण्याची घोषणा केली होती. यामुळे आता त्यांना 1.6 लाख नाही तर 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकणार आहे.