Republic Day 2023 : दाढीमिशा वाढवून दहशतवाद्यांमध्ये वावरत होता भारताचा 'रक्षक'; मृत्यूशी केलेली मैत्री

Republic Day 2023 : भारताचा प्रजासत्ताक सर्व देशात धुमधडाक्यात साजरा होईल. या दिवशी दिल्लीमध्ये राजपथावर पथसंचलन करताना सैन्यातील जवानांना पाहून ऊर अभिमानानं भरून येईल. ही गोष्ट सुद्धा तशीच काहीशी अनुभूती देईल.   

Updated: Jan 25, 2023, 10:12 AM IST
Republic Day 2023 : दाढीमिशा वाढवून दहशतवाद्यांमध्ये वावरत होता भारताचा 'रक्षक'; मृत्यूशी केलेली मैत्री  title=
republic day 2023 major mohit sharma infiltrated hizbul mujahideen camp as a terrorist itself read full story

Republic Day 2023 :  देशात सध्या प्रजासत्ताक दिनाचा (Rapublic Day ) उत्साह पाहायला मिळत आहे. दिल्लीदरबारी अनेक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं आहे. या खास दिवशी देशाच्या कानाकोपऱ्यात (Indian Flag) तिरंगा अभिमानानं फडकवला जाईल. देशाचा ध्वज जेव्हाजेव्हा उंचावतो तेव्हातेव्हा अभिमानानं ऊर भरून येतो. अंगावर काटा आणणारे हे क्षण प्रत्येक वेळी एक नवा अनुभव देणारे असतात. असाच अंगावर शहारे आणणारा अनुभव देतेय एका अशा अधिकाऱ्याची गोष्ट ज्यानं देशसेवेत स्वत:ला इतकं झोकून दिलं की एका काळानंतर तो मृत्यू सोबतच वावरत होता. त्याच्यासाठी देशहिताहून जास्त महत्त्वाचं असं काहीच नव्हतं. 

कोण होते ते जिगरबाज अधिकारी? 

मेजर मोहित शर्मा, असं त्यांचं नाव. भारतीय लष्कराच्या (Indian Army) सेवेत असताना उत्तर काश्मीरमधील (Kashmir Kupwada) कुपवाडा सेक्टरमध्ये ब्रावो स्ट्राईक टीमचं नेतृत्वं करताना त्यांनी आपले प्राण गमावले होते. डिसेंबर 1999 मध्ये ते मद्रास रेजिमेंटमध्ये हैदराबाद येथून लेफ्टनंट पदावर ते लष्करी सेवेत रुजू झाले. तीन वर्षांच्या सेवेनंतर त्यांनी पॅरा मिलिटरी फोर्समध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि 2003 मध्ये ते प्रशिक्षित पॅरा कमांडो म्हणून सर्वांसमोर आले. 2003 मध्ये त्यांना कॅप्टन म्हणून नियुक्त करण्यात आलं. 

नोकरीमध्ये मिळालेल्या या बढतीसोबतच त्यांना काश्मीरला पाठवण्यात आलं. ही तिच जागा होती, जिथं त्यांनी अद्वितीय शौर्य सिद्ध केलं होतं. 2004 हे तेच वर्ष होतं ज्यावेळी त्यांना हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेमध्ये घुसखोरी करत त्यांची गोपनीय माहिती मिळवण्याचं मिशन सोपवण्यात आलं. यापुढे मोहित शर्मा 'इफ्तिखार भट्ट' म्हणून एका नव्या रुपात समोर आले. त्यांना दहशतवाद्यांशी संपर्क साधण्यात यश मिळालं होतं. कट्टरवाद्यांना संशय येऊ नये आणि त्यांच्याशी संवाद साधणं अधिक सोपं व्हावं यासाठी त्यांनी दाढी- मिशा वाढवल्या होत्या, हळुहळू ते दहशतवाद्यांच्याच वेशात वावरू लागले. त्यांनी आपलं लक्ष्य साध्य केलं होतं. 

republic day 2023 major mohit sharma infiltrated hizbul mujahideen camp as a terrorist itself read full story

भारतीय लष्करावर हल्ला करण्याचा तो कट... 

दहशतवाद्यांचा विश्वास जिंकण्यासाठी शर्मा (इफ्तिखार भट्ट) यांनी एक गोष्ट रचली होती. 2001 मध्ये आपल्या भावाला मारल्यामुळं भारतीय लष्करावर हल्ला करण्याचा कट आपण रचत असल्याची कथा त्यांनी दहशतवाद्यांना सांगितली आणि त्यांचाही यावर विश्वास बसला होता. अबू तोरारा आणि अबू सबजार या दोन दहशतवाद्यांशी त्यांची ओळख वाढली. ज्यानंतर लष्कराच्या एका चौकीवर हल्ला करण्यासाठी त्यांनी ग्रेनेडची सोय केली. 

'अगर तुम्‍हें कोई शक है तो मुझे मार दो'

दहशतवाद्यांचा विश्वास जिंकण्यासाठी म्हणून शर्मा यांनी त्यांना काही नकाशेही दाखवले. जेव्हा जेव्हा त्यांना ओळख विचारणारे प्रश्न विचारले जायचे तेव्हा तेव्हा ते तिथून शिताफीनं काढता पाय घेत होते. अखेर मोहित यांनी वेश धारण केलेल्या इफ्तिखारची मदत करण्यासाठी दहशतवादी तयार झाले. आपण पुढील काही दिवस अंडरग्राऊंड असू असं सांगत त्यांनी आता आपण भारतीय लष्करावर हल्ला करूनच माघारी येऊ असं सूडबुद्धीनं म्हणत दहशतवाद्यांचा विश्वास पूर्णपणे जिंकला होता. ग्रेनेड आणि दहशतवाद्यांची सोयही झाली होती. पण, तोराराला मोहित शर्मा यांच्यावर संशय आला आणि हे त्यांच्याही लक्षात आलं होतं. 'अगर तुम्‍हें कोई शक है तो मुझे मार दो', असं म्हणत त्यांनी हातातली एके-47 जमिनीवर टाकली. तोरारा एकाएकी सबजारकडे पाहू लागला, तितक्यातच त्या दोघांनीही हत्यारं टाकली. त्याचवेळी मेजर मोहित शर्मा यांनी त्यांच्याकडे असणारं 9 एमएम पिस्तुल लोड केलं आणि दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केला. पाकिस्तानच्या हद्दीत त्यांनी दहशतवाद्यांचा खात्मा करत हा पराक्रम केला होता. 

republic day 2023 major mohit sharma infiltrated hizbul mujahideen camp as a terrorist itself read full story

हेसुद्धा पाहा : Republic Day : प्रजासत्ताक दिनासाठी जय्यत तयारी सुरू, फुल ड्रेस रिहर्सलचे Photo आले समोर!

 

ती अखेरची मोहीम... 

मेजर मोहित शर्मा 21 मार्च 2009 मध्ये काश्मीरमधील कुपवाडा येथे शहीद झाले. दहशतवद्यांशी दोन हात करतानाच त्यांना वीरमरण आलं होतं. पण, यापूर्वी त्यांनी 4 दहशतवाद्यांचा खात्मा करत आपल्या सोबतीनं असणाऱ्या जवानांचा जीव वाचवला होता. या असामान्य कामगिरीसाठी मेजर शर्मा यांना सैन्याकडून मरणोत्तर अशोक चक्र या सर्वोच्च सैन्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. सेना मेडलनं गौरवलेल्या शर्मा यांनी ज्या मोहिमेचं नेतृत्त्वं केलं होतं त्याला 'ऑपरेशन रक्षक' असं नाव देण्यात आलं होतं.