रजनीकांतच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची नोंदणीसाठी गर्दी

 दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या नव्या पक्षाची बांधणी सुरू झालीय.

Updated: Jan 27, 2018, 12:59 PM IST
रजनीकांतच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची नोंदणीसाठी गर्दी title=

चेन्नई : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या नव्या पक्षाची बांधणी सुरू झालीय.

प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून शुक्रवारी 'पिपल्स फोरम' या संघटनेसाठी चेन्नईमध्ये नोंदणी सुरू झालीय.

थलैवाचे फोटो असलेल्या पताका, पक्षामध्ये सहभागी होण्याचं आवाहन करणारे मोठमोठे फलक आणि चाहत्यांची रीघ असं चित्र या ठिकाणी बघायला मिळालं.

एवढी वर्षं रजनीकांतचे फॅन असलेले शेकडो लोक आता त्याचे कार्यकर्ते म्हणून नव्या पक्षाचं काम करणार आहेत.