कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालावर रजनीकांंत म्हणाले ...

 

Updated: May 20, 2018, 09:57 PM IST

 

कर्नाटक :   कर्नाटकामध्ये विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर सत्तेसाठीचा संघर्ष तीव्र झाला आहे. सत्ता स्थापनेसाठी राजकीय पक्षांची कसरत सुरू आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपनं मागितलेला आणखी काही वेळ आणि राज्यपालांनी त्यासाठी दिलेले पुढील काही दिवस यावरून अनेक राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. 
 
 कर्नाटकात सुरू असलेल्या सत्ता संघर्षावर अभिनेते रजनीकांत यांनी त्यांची मतं  मांडली आहेत. 

काय म्हणाले रजनीकांत ? 

 कर्नाटकात लोकशाहीचा विजय झाला, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांनी दिली आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपनं मागितलेला आणखी काही वेळ आणि राज्यपालांनी त्यासाठी दिलेले १५ दिवस म्हणजे लोकशाहीची थट्टा होती, अशी प्रतिक्रिया रजनीकांत यांनी व्यक्त केली आहे.