मुंबई : परमनंट अकाऊंट नंबर म्हणजेच पॅन कार्ड नंबर हे सध्याच्या घडीला महत्त्वाच्या कागदपत्र पुराव्यांपैकी एक आहे. आयकर विभागाकडून पॅन कार्ड नागरिकांना देण्यात येतं. यामध्ये 10 आकडे असणारा एक युनिक अल्फान्यूमरिक नंबर असतो. सर्व करसंबंधित कामांसाठी आणि बऱ्याच व्यवहारांसाठी पॅन कार्डचा वापर केला जातो. (Pan Card)
गेल्या काही काळापासून मात्र याच पॅन कार्डचा चुकीच्या पद्धतीनं वापर केल्याच्या घटना वाढल्या. यामध्ये कलाकारही फसल्याचं पाहायला मिळालं. अभिनेत्री सनी लिओनी हिच्यानंतर आता राजकुमार राव याच्याही पॅन कार्डचा चुकीच्या पद्धतीनं वापर झाल्याची माहिती समोर आली.
ट्वीट करत त्यानं यासंदर्भातली माहिती दिली. आपल्या पॅन कार्डचा वापर चुकीच्या पद्धतीनं झाल्याचं सांगितलं. त्यामुळं पॅन कार्डची हिस्ट्री पाहणं आणि सर्व माहितीचा तपशील लक्षात घेणं कायम महत्त्वाचं ठरतं.
कशी तपासाल पॅन कार्डची हिस्ट्री...