मुंबई : हवामान बदल परिषदेला आजपासून होतेय. ग्लोबल वॉर्मिंग जगावर होणारा परिणाम, शहरांवरील वाढत्या प्रदुषणाचे दुष्परिणाम, यावरील उपययोजना या सर्वांवर जगभरातील प्रतिनिधींची चर्चा होत असते. पण आजपासून सुरू होणारी ही परिषद ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
हवामान बदल परिषदेत जागतिक नेते सहभागी होतील पण यावेळी ही परिषद ऑनलाईन होणार आहे. आजपासून ही परिषद होणार आहे. प्रदूषण टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. याआधी जगातल्या विविध शहरात दरवर्षी जागतिक नेते मंडळी येऊन पर्यावरणाबाबत चर्चा करायचे.
मात्र त्यामुळे त्या शहराचं प्रदूषण वाढायचं. नेते मंडळी, त्यांचा अधिकाऱ्यांचा ताफा, त्यांची विशेष विमानं, त्यांची आलीशान राहण्याची सोय या सगळ्यातून मोठ्या प्रमाणात प्रदूषणाला हातभार लागतील अशाच गोष्टी निर्माण व्हायच्या.
हे सर्व टाळण्यासाठी ही परिषद ऑनलाईन घेण्याची कल्पना मार्शल आयलँडच्या अध्यक्ष हिल्डा हेन यांनी मांडली.
ग्लोबल वॉर्मिंगचा सर्वाधिक फटका मार्शल हायलँड या छोट्याशा देशाला बसणार आहे. त्यामुळे हे द्वीप पाण्यात नष्ट होण्याचीही भीती आहे.
त्यामुळे त्यांनी ही संकल्पना मांडली आणि ती आता प्रत्यक्षातही येणार आहे.